मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन

 0
मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन

मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी चे उद्घाटन

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) श्री छत्रपती शिव चरित्र पारायण सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते मंगळवारी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आले.

19 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमीत्त श्री छत्रपती शिव चरित्र पारायण सोहळा समितीच्या वतीने क्रांती चौक येथे 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत सर्व समाजात एकता, बंधुभाव, तसेच समता निर्माण व्हावी हा उद्देश घेऊन मागील 7 वर्षा पासून ग्रंथ दिंडीचे आयोजन केले जातात. क्रांती चौक या सप्ताहच्या अनुषंगाने सकाळी 8 ते 11.30 पर्यंत शिवचरित्राचे पारायण केले जाणार आहे. 

यावेळी समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मंत्री श्री अतुल सावे यांनी घेतला लेझिमचा आनंद...

या ग्रंथ दिंडी च्या निमित्ताने विविध देखावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली होती. या पालखी पुढे शाळेचे विद्यार्थी मोठ्या आनंदात लेझिम खेळत होते. त्यांच्या आनंदात राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी देखील सहभागी होत त्यांच्या सोबत लेझिम खेळण्याचा

आनंद घेतला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow