शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ, पोलिस अलर्ट, पोलिस आयुक्त यांची माहिती

 0
शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ, पोलिस अलर्ट, पोलिस आयुक्त यांची माहिती

शहरात एसआरपीएफ जवान तैनात, पोलीस अलर्ट पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया यांची माहिती

औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) जिल्हा व शहरात मराठा आरक्षण आंदोलने सुरू आहेत. बीड व अन्य ठिकाणी आंदोलनादरम्यान जाळपोळीच्या घटनेनंतर शहर पोलिस अलर्ट झाले आहे.

शहराचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी मराठा आंदोलनाच्या धर्तीवर पोलीस खाते अलर्ट केले असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून पेट्रोलिंग वाढविण्यात आलेली आहे.

 फिक्स पॉईंटबरोबरच होमगार्डची मदत घेण्यात येत आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे की, चुकीच्या पोस्ट तसेच अफवा पसरू नये. 

मराठा आंदोलन राज्यभर पेटले असून ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना तर कुठे बंद पाळण्यात येत आहे. शहरात एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दोन्ही बसस्थानक परिसरात शुकशुकाट आहे तर बससेवा बंद करण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट आहे. एसआरपीएफच्या तुकड्या व पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून फिक्स पॉईंट लावण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हिंसक वळण लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस खाते अलर्ट झाले अशी माहिती पोलीस आयुक्त श्री लोहिया यांनी दिली. ते म्हणाले की, सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट पसवणाऱ्यांवर तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशी चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow