राष्ट्रवादीचे पोलिस आयुक्तांना निवेदन, कारवाईची मागणी
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (सल्ललाऊ अलैही व सल्लम ) यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पोलीस आयुक्त यांना निवेदन...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) गंगागिरी महाराज संस्थान,सरला ता.श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील महंत रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताह,मौजे पंचाळे,ता.सिन्नर जिल्हा नाशिक येथे प्रवचन दरम्यान उपस्थित लोकासंमक्ष लाइव्ह प्रक्षेपण दरम्यान इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब (सल्ललाऊ अलैही व सल्लम)व आई आएशा (र.अ.)यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सर्व इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या मुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी याचे निवेदन शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वात औरंगाबाद पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, प्रदेश कार्याध्यक्ष (अ.वि.)मुश्ताक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, प्रदेश उपाध्यक्ष (अ.वि.)सलीम पटेल वाहेगावंकर, माजी महापौर रशीद खान मामू, शहर जिल्हा बुथ प्रमुख तथा शहर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई),
शहर जिल्हाध्यक्ष (अ.वि.)मोहम्मद ताहेर, शरह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तय्यब खान, महिला पुर्व वि.स.म.सं.अध्यक्ष मंजुषाताई पवार, पुर्व वि.स.म.सं.अध्यक्ष (अ.वि.)शेख समीर, शहर जिल्हा सरचिटणीस शेख मुख्तार, प्रदेश सचिव (अ.वि.)अशरफ पठाण,शहर उपाध्यक्ष समीर मिर्झा, शहर उपाध्यक्ष अनवर नवाब, युवक शहर कार्याध्यक्ष शेख फारूक, युवक मध्य वि.स.म.सं.कार्याध्यक्ष शेख शाहरूख, जलील अहमद खान, इस्माईल राजा, प्रदेश सचिव (अ.वि.)मोहम्मद शेरू, शहर सचिव अनिसा बाजी,गजल जमादार, इत्यादी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?