रेल्वे पोलिसांनी वाचवले महीलेचे प्राण...!

रेल्वे पोलिसांनी वाचवले महीलेचे प्राण....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)
औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण. आज 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 09. 27 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन औरंगाबाद येथे लोहमार्ग पोलिसाची नियमित गस्त चालू असताना गाडी क्रमांक 12072 जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना आपल्या पवित्र उमराह यात्रेसाठी जाणाऱ्या मुलाला श्रीमती बानोबी शेख रशीद ह्या सोडण्यासाठी आल्या व अचानक गाडी चालू झाल्यानंतर त्या गाडीमध्येच राहिल्या व गडबडीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन खाली पडल्या त्याच वेळी गस्तीवर असलेले पोलीस अमलदार ज्ञानेश्वर शिरसागर व अश्रुबा गेजगे यांचे लक्ष गेल्याने त्यांनी लागलीच धाव घेऊन महिलेला ट्रेन खाली जात असताना तात्काळ बाहेर खेचल्यामुळे महिलेला दुखापत झाली नाही. त्यानंतर महिलेला सुरक्षित यांचे नातेवाईकाचे ताब्यात देण्यात आले... त्याकरता त्यांचे कामगिरी चे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे समासेवक अशरफ खान व समाजसेवक मुसा खान यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो. नि. शरद जोगदंड व स. पो.नि.गणेश दळवी तथा ज्ञानेश्वर शिरसागर अश्रुबा गेजगे यांचा पोलीस ठाण्यात सत्कार व अभिनंदन केले
.
What's Your Reaction?






