महाविद्यालयात कायद्याची नवीन सुधारित कलमांबद्दल जनजागृती

 0
महाविद्यालयात कायद्याची नवीन सुधारित कलमांबद्दल जनजागृती

महाविद्यालयात कायद्याची नवीन सुधारित कलमांबद्दल जनजागृती 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)

पोलीस उपायुक्त स्वामी यांच्या आदेशान्वये व पोलिस निरीक्षक तेजश्री पाचपुते भरोसा सेल यांच्या मार्गदर्शनाखाली जुन जुलै 2024 मध्ये नवीन कायद्यामध्ये नवीन नियम बदल झाले अमलात आले या विषयावर ऍडव्होकेट अमोल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला निंभोरे, हेड कॉन्स्टेबल पोलिस अंमलदार कल्पना नागरे, प्रदीप कांबळे सह शरदचंद्रजी पवार येथे पॉलिटेक्निकल कॉलेज येथे पोलीस प्रशासनाकडून विविध उपक्रम बाबत जनजागृती विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अॅडवोकेट अमोल देशमुख उच्च न्यायालयात हायकोर्ट यांनी कायद्यामध्ये नवीन नियम बदल झालेल्या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दामिनी पथकचा मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याबाबत माहिती दिली. यांच्यासह शहरातील शाळांमध्ये व कॉलेज महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना नवीन कायद्याची माहिती दिली . शरदचंद्रजी पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य श्री अंभोरे, प्राध्यापक श्रीमती नंदा बरथरे मॅडम सर्व प्राध्यापक वर्ग यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. विद्यार्थ्यांचा सदर कार्यशाळेला उत्सव पूर्वक प्रतिसाद दिसून आला तसेच शरदचंद्रजी पवार पॉलिटेक्निकल कॉलेज नर्सिंग कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज प्राचार्य सर सहप्रशासन दामिनी पथक पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow