सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवकाची भुख हडताल करण्याचा मनपाला इशारा...?
 
                                सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवकाची भुख हडताल करण्याचा मनपाला इशारा...?
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उबाठाच्या वतीने शहरात पाणी प्रश्न मनपा प्रशासनाने सोडवायला हवा यासाठी मागिल तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तर सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे वार्ड क्रं.20, आसेफिया काॅलनीचे माजी नगरसेवक सय्यद मतीन यांनी मनपा प्रशासनाने वार्डातील दोन कोटींचे वर्क ऑर्डर रोखल्याने पाण्याचे पाईप लाईन व रस्त्याचे कामे रखडली असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मनपा आयुक्तांना पत्र देऊन इशारा दिला आहे की सात दिवसांत वार्डातील विकासकामे सुरू झाली नाही तर मनपासमोर भुख हडताल करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवकाने दिला आहे. आता या प्रकरणी मनपा प्रशासन काय निर्णय घेतात याकडे वार्डातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            