नागरीकांना व जनावरांना हानिकारक नायलॉन मांजा विक्री बाळगताना आढळल्यास गुन्हा दाखल करणार
नागरिकांना व जनावरांना हानिकारक प्लास्टिक/नायलॉन मांजाची विक्री /बाळगताना आढळल्यास दुकानदार /नागरिकांवर गुन्हे दाखल करणार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार पक्का धागा म्हणुन ज्ञात असलेल्या, पतंग उडविण्यासाठी वापरला जाणा-या प्लास्टिक पासुन किंवा (सिंथेटिक) कृत्रिम पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोर किंवा नायलॉन किंवा (सिंथेटिक) कृत्रिम मांजा हे, मनुष्य जातीला आणि पक्षांना इजा पोहचत असल्याचे व घातक ठरत असल्याचे सर्वसाधारणपणे ज्ञात आहे. अशा धाग्यांचे जैविकरित्या विघटन होत नसल्यामुळे मलप्रणाली, जलनिस्सारण यंत्रणा, नद्या, ओढे, जलाशय, अवरोधित होतात आणि जैविक विघटन न होणारे पदार्थ खाल्याने जनावरे गुदमरतात तसेच पशुपक्ष्यांना व नागरिकांना इजा पोहचते यांसह पर्यावरणाचे अनेक मार्गाने नुकसान होते.
संदर्भ :
- 1. राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली मुळ अर्ज क्र.384/2016
2. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ क्रमांक 59 दि. 01 मार्च, 2023
3. शासन निर्णय क्र. PIL-2021/CR-14/TC-1 Dt.25/08/2023
संदर्भ क्र.01 च्या आदेशान्वये मनुष्य जातीवर व पक्ष्यांवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्याच्या दृष्टीने अशा प्लास्टिकच्या किंवा (सिंथेटिक) कृत्रिम धाग्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्याबाबत आदेश दिले संदर्भ क्र. 02 अधिसुचना व संदर्भ क्र.03 च्या शासन निर्णयानुसार प्लास्टिकच्या किंवा (सिंथेटिक) कृत्रिम धाग्यावर प्रतिबंध घालण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका उपआयुक्त, दुकाने आस्थापना अधिकारी आणि निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांनी नामनिर्देशित केलेला अन्य कोणताही अधिकारी यांना त्यांच्या संबंधित अधिकार क्षेत्रात, उक्त विनिमयांच्या तरतुदींच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
या अनुषंगाने प्लास्टिकच्या किंवा (सिंथेटिक) कृत्रिम धागा / नायलॉन मांजा विक्री करतांना, बाळगतांना, वापरतांना आढळल्यास संबंधित दुकानदार/आस्थापना /नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच गरज भासल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येईल.
असे अतिरिक्त आयुक्त्-1 रणजीत पाटील यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?