काँग्रेसची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक तयारी, इच्छूकांची गांधी भवन येथे गर्दी

 0
काँग्रेसची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक तयारी, इच्छूकांची गांधी भवन येथे गर्दी

काँग्रेसची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक तयारी, इच्छूकांची गांधी भवनात गर्दी...

गट आणि गनात प्रत्येकी पाच कार्यकर्ते इच्छूक - तालूकाध्यक्ष मनोज शेजुळ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर तालूक्यात जिल्हा परिषदेच्या दहा तर पंचायत समितीच्या 20 जागा आहे. आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी मतदार संघात तयारी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी तालूका काँग्रेस इच्छूकांचे अर्ज वितरण मागिल दोन दिवसांपासून गांधी भवन येथे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व खासदार डॉ कल्याण काळे यांच्या सुचनेनुसार सुरू करण्यात आले आहे. इच्छूकांचे अर्ज दिनांक 30 ऑक्टोबर पर्यंत स्विकारले जातील अशी माहिती तालूकाध्यक्ष मनोज शेजुळ यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर तालूका काँग्रेसच्या वतीने मागिल दोन दिवसांपासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छुक कार्यकर्त्यांना अर्जाचे वितरण सुरू आहे. दहा गट व 20 गन तालूक्यात आहे. उद्या गुरुवारी इच्छूकांना अर्ज वितरण करण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक गट आणि गनात पाच कार्यकर्ते इच्छूक आहे. इच्छूकांचे अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवली जाणार आहे. पक्ष पातळीवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जाईल. तालुक्यात मागिल निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या पाच जागा व पंचायत समितीच्या आठ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. यंदा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेची कामे करणारे व सक्षम आणि विजयी होणारे उमेदवार पक्षाकडून दिले जाणार आहे. सर्व समाजाला न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही अशी माहिती छत्रपती संभाजीनगर काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज शेजुळ यांनी दिली. यावेळी तालूका कार्याध्यक्ष विठ्ठल कोरडे, कार्याध्यक्ष विनोद देहाडे व पदाधिकारी उपस्थित होते.

लाड सावंगी सर्वसाधारण जिल्हा परिषद गटाकडून अर्चना पंजाबराव पडूळ, दौलताबाद गटाकडून श्रीमती कांचन साठे, पंचायत समिती गांधेली गणातून डॉ.रवी पवार, पळशी गणातून शकील शाह, संतोष राठोड यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक अर्ज भरला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow