शेतकऱ्यांना सात दिवसांत मदत मिळाली नाही तर काँग्रेस आमरण उपोषणाला बसणार - मनोज शेजुळ
शेतकऱ्यांना सात दिवसांत मदत मिळाली नाही तर काँग्रेस आमरण उपोषणाला बसणार - मनोज शेजुळ
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- राज्य शासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली होती. ती मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी संकटात गेली. त्यांची काळी दिवाळी ठरली. शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला. 4 नोव्हेंबर पर्यंत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही तर छत्रपती संभाजीनगर तालूक्यातील शेतकऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसणार असे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज शेजुळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले.
याप्रसंगी तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल कोरडे, कार्याध्यक्ष विनोद देहाडे, विक्रम कांबळे, दादाराव आढावे, गौतम घोरपडे, शंकरराव चव्हाण, कैलास पाखरे, बाळू लाठे, बाबासाहेब कुलकर्णी, अनिल चव्हाण, गणेश चव्हाण, योगेश ठोंबरे, सुनील तारी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?