हाजी तय्यब पटेल यांचे निधन, आज रात्री दफनविधी

 0
हाजी तय्यब पटेल यांचे निधन, आज रात्री दफनविधी

हाजी तय्यब पटेल यांचे निधन, आज रात्री दफनविधी

छ.संभाजिनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) अल्तमश काॅलनी, रहेमानिया काॅलनी येथील रहिवासी भिमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते हाजी तय्यब पटेल शेख इमाम, वय 52, यांचे आज निधन झाले. हैदराबाद येथे कामानिमित्त गेले असता तेथे तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले अशी माहिती त्यांचे नातेवाईक शाकेर पटेल यांनी डि-24 न्यूजला दिली आहे. हाजी तय्यब पटेल हे किराडपूरा येथील माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांचे लहान भाऊ होते. दलित चळवळीत काम करुन त्यांनी राजकीय सामाजिक कार्य करत होते. राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते. अचानक त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात शोककळा पसरली. तय्यब पटेल हे नेहमी सर्वांच्या सुख दु:खात सहभाग घेत त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे व हस-या चेह-याने परिचित होते. त्यांचा नमाज-ए-जनाजा आज रविवारी रात्री 11 वाजता रौशन मस्जिद येथे होईल. दफनविधी तेथील कब्रस्तानात केला जाईल. त्यांच्या पश्चात 3 भाऊ, एक बहीण, पत्नी, पाच मुली, एक मुलगा, नातीपोती असा मोठा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow