उद्या महाराष्ट्र युथ मूवमेंटच्या वतीने शहरात भव्य रक्तदान शिबीर

 0
उद्या महाराष्ट्र युथ मूवमेंटच्या वतीने शहरात  भव्य रक्तदान शिबीर

उद्या महाराष्ट्र यूथ मूवमेंटच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

छ.संभाजिनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)

महाराष्ट्र यूथ मूवमेंट (पूर्वीचा जमात-ए-इस्लामी हिंदचा यूथ विंग) पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जन्म महिन्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहे. शहरात स्थानिक शिबिरे उद्या 16 सप्टेंबर रोजी पुढील ठिकाणी आयोजित केले आहेत.

मरकज-ए-इस्लामी, युनुस कॉलनी

लाल मशीद, टाऊन हॉल

पैठण गेट

झम झम हॉल, सिल्क मिल्स कॉलनी

कोहिनूर लॉन, रोजा बाग

गायत्री कॉम्प्लेक्स, मेन रोड, चिकलठाणा

शिबिरे सकाळी 9:30 वाजता सुरू होऊन रात्री 10 वाजेपर्यंत चालतील. मागील वर्षांप्रमाणेच, यंदाही दात्यांचा उत्साही प्रतिसाद अपेक्षित आहे. महाराष्ट्र यूथ मूवमेंट गेली 16 वर्षे हे शिबिरे आयोजित करत असून, याला नेहमीच समुदायाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक आरोग्य सेवेला बळकट करणे आणि गरजूंसाठी रक्ताचा साठा पुरवणे हा आहे. या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले योगदान द्या व अनमोल जीवन वाचवण्यास मदत करा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow