मनपा आयुक्त यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचा-यांचा सत्कार...!
आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेतील दीर्घकाळ प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आज मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी सहाय्यक आयुक्त नईम अहमद अन्सारी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर तसेच अनुरेखक मजहर अली यांचा शाल, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्यासह विविध प्रवर्गातील एकूण 15 अधिकारी व कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले.
यावेळी मुख्य लेखापरीक्षक शि. बा. नाईकवाडे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेला गौरवपूर्वक सलाम करत त्यांना निरोगी, आनंदी व यशस्वी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?