मनपाच्या विद्यार्थ्यांचा ESRO ला भेट देऊन विक्रम, मनपा आयुक्तांना पाठवली राॅकेटची प्रतिकृती...
मनपाच्या विद्यार्थ्यांनी दिली ISRO ला भेट...
इस्रो येथील अधिकाऱ्यांनी दिली आयुक्तांसाठी रॉकेट ची प्रतिकृती भेट...
विद्यार्थ्यांनी पाहिले रॉकेट प्रक्षेपण...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडन्ट एक्झाम घेऊन त्यामधील टॉप टेन विद्यार्थ्यांची निवड इस्रोला भेट देण्यासाठी केली होती.या विद्यार्थ्यांनी आज विक्रम साराभाई स्पेस सेंटर (थुंबा त्रिवेंद्रम) तिरुवनंतपुरम केरळ येथे भेट दिली.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी बाल दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना विमानाने थेट केरळ ला पाठविले होते. विद्यार्थांनी प्रथमच विमान प्रवास केला होता.
आज त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देऊन रॉकेटचे प्रक्षेपण पाहिले तसेच तेथे या पूर्वी विविध रॉकेट चे प्रक्षेपण केलेले रॉकेट पाहिले. या संग्रहालय मध्ये चंद्रयान 3 प्रतिकृती, स्टॅलेट, आर्यभट्ट , रोहिणी 200 ,या सह विविध रॉकेटच्या प्रतिकृती पाहिल्या.
भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान हे असणार आहे ते कसे असेल याचीही प्रतिकृती विद्यार्थ्याना तेथील अधिकाऱ्यांनी दाखविली.
मनपा शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी कसे आले आहेत असे त्यांनी विचारले असता त्यांना मनपा आयुक्त तथा प्रशासक महोदय यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या स्मार्ट परीक्षेबाबत सांगितले असता त्यांनी रॉकेट ची प्रतिकृती आयुक्त तथा प्रशासक यांना भेट देण्यासाठी दिली.
ISRO हे ठिकाण विद्यार्थ्यांना पाहण्याची अशी संधी महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली आहे या मध्ये मनपा के प्रा शाळा नारेगाव, सिडको एन 7, हर्सूल, इंदिरानगर बायजीपुरा, आणि प्रा शाळा विटखेडा व मिटमिटा या शाळेतील विद्यार्थी आहेत हे सर्व उद्या सायंकाळी विमानाने परत छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत.
विद्यार्थ्या सोबत अंकुश पांढरे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी , किरण तबडे ,मंगेश जाधव, उमा पाटील,सविता बांबर्डे शिक्षक होते.
What's Your Reaction?