पावसाळ्यात लाईटच्या खांबात विज प्रवाह उतरला तर मनपाला कळवा, नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 0
पावसाळ्यात लाईटच्या खांबात विज प्रवाह उतरला तर मनपाला कळवा, नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पावसाळ्यामध्ये लाईट च्या खांबात वीज प्रवाह उतरला तर मनपाला कळवा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन...

मनपा विद्युत विभागाचे मान्सून पूर्व कामे पूर्ण...

पावसाळी व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज...

 

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या वतीने आयुक्त जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार पावसाळी व्यवस्थापनासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

  दरवर्षी पावसाळी हंगामात वादळी वाऱ्यांमुळे किंवा जोरदार पावसामुळे शहरातील पसंतीव्यांच्या खांबामध्ये किंवा म. रा. वि. वि.कंपनीच्या वीज वाहक खांबामध्ये वीज प्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना या बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यात विद्युत पोलला वायर , तारा, दोऱ्या बांधून त्याचा उपयोग कपडे वाळविण्यासाठी किंवा पाळीव प्राणी बांधण्यासाठी, छोटे बॅनर लावण्यासाठी करू नये.

पावसाळ्याच्या दिवसात पोल मध्ये वीज प्रवाह उतरून अपघात होऊन प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अबाल वृद्ध व नागरिकांनी पोलला स्पर्श करू नये किंवा दुभाजकावरून रस्ता ओलांडताना विद्युत पोल, केबल ,जंक्शन बॉक्स इत्यादींना स्पर्श करू नये. तसेच शहरातील विस्तारित भागात नागरिकांतर्फे फोनवर पथदिवे चालू व बंद करण्यासाठी स्वतंत्र वायर नसताना परस्पर खोलवर पथदिवे लावण्यात येतात. व पथदिवे वायर एमसीबी किटकॅट इत्यादी द्वारे चालू बंद करण्यात येतात. एखाद्या पोल मध्ये विद्युत प्रवाह असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित महानगरपालिकेस कळवावे. तसेच म. रा. वि. वि.कंपनी यांच्याशी संपर्क करावा व महानगरपालिकेत सहकार्य करावे.

या अनुषंगाने नागरिकांच्या सोयीसाठी पावसाळ्यात रस्त्यावरील पथदिव्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार प्रभाग निहाय अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यात इलेक्ट्रॉन कंपनीचे झोन प्रमुख झोन क्रं.०१ विक्रम जगताप ९८९०२८३५५५, कनिष्ठ अभियंता सागर गायकवाड ८८३०४८३६११.

झोन क्रं.०२ लखन ठाकूर ८६६९०२८७६४,एस एस. काटे ९७६४९९७०९१.

झोन क्र.०३. जमीर शेख ९६७३६५४४४४ , ऋषिकेश चव्हाण ९९७०४६६३५७

झोन क्र.०४. विकास सीतापुरे ९७६४४५५५४५, एस एस. काटे ९७६४९९७०९१.

झोन क्र.०५.राजेश गोरे ७८४१९४४४४४,सतीश उरकुडे ९५१८७६४५१७.

झोन क्र.०६.लक्ष्मण धनवे ७५८८०७५७७४,वैशाली मोरे ९०६७०१६९५०.

झोन क्र.०७. विशाल चव्हाण ९९७५९८५८५९, सुफियान ९१७५११९१४५.

झोन क्र.०८. सचिन सकट ९८३४६०४४८०,सय्यद बद्रोद्दिन ९७६४९९७०८८.

झोन. क्र.०९.किशोर मानकापे ९८२३३२४५४५,अजित सुरवसे ९५६१७२०५४३.

झोन क्र.१०. सचिन सकट ९८३४६०४४८०,अमोल गोसावी ७६२०४२१८४९.

व उप अभियंता विद्युत मोहिनी वारभुवन (गायकवाड) ९७६४९९७०७७.

वरील अधिकारी कर्मचारी यांच्याशी रस्त्यावरील पथदिव्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संपर्क करावा असे कार्यकारी अभियंता विद्युत विभाग महानगरपालिका यांनी कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow