गणेशोत्सव व ईद-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शहरात पथसंचलन...

 0
गणेशोत्सव व ईद-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शहरात पथसंचलन...

गणेशोत्सव, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी

सध्या सुरु असलेला गणेशोत्सवाचा सण, अनंत चर्तुदशी, ईद-ए-मिलाद आदी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाच्या वतीने मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी सिटीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात शहर पोलिस दलासह रॅपीड ॲक्शन फोर्सचे जवान सहभागी झाले होते.

गणेशोत्सव, अनंत चर्तुदशी, ईद-ए-मिलाद आदी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलाच्या वतीने मंगळवारी पोलिस उपायुक्त पंकज अतूलकर यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले. सिटीचौक पोलिस ठाण्यापासून पथसंचलनास सुरुवात झाली. सिटीचौक, गांधीपुतळा, शहागंज, फाजलपूरा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील, संपत शिंदे, रॅपीड ॲक्शन फोर्सचे उपायुक्त अलोक कुमार झा, संतोष कुमार, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, संजय माने, पिआय बुधवंत, कुंदन कुमार वाघमारे, विशाल पखाले आदीसह सिटीचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच पथसंचलनात दंगा नियंत्रक पथकाचे जवानही सहभागी झाले होते.

शांततेत सण-उत्सव साजरे करा

गणेशोत्सव, अनंत चर्तुदशी, ईद-ए-मिलादुन्नबी आदी सण-उत्सव शहरवासीयांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावे असे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी केले. तसेच सण-उत्सव काळात दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर पोलिसांचे लक्ष असून शहरवासीयांनी कोणत्याही अफवेवर विश्वार ठेवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow