मनपा प्रारुप प्रभाग रचनेवर काँग्रेसची हरकत दाखल, न्यायालयात जाणार...
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महानगरपालिका प्रभाग रचना संदर्भात हरकत दाखल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - महानगरपालिका निवडणूक 2025 संदर्भात निवडणूक आयोगाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित प्रभाग रचनेवर आपले विविध अक्षेप घेऊन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अध्यक्ष शेख युसूफ यांनी हरकत दाखल केली आहे.
त्या मध्ये प्रभागांची चुकीची रचना, सीमा ओलांडून केलेले प्रभाग, लोकसंख्या नुसार वाढणारे वॉर्ड आदी मुद्दे होते.
सदरील प्रभाग रचना रद्द न केल्यास कोर्टात याचिका दाखल करण्यात येईल असे मत शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ यांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?