SDPI चे लोकसभेत आव्हान, औरंगाबादसह तीन जागा लढणार...!
SDPI चे लोकसभेत आव्हान, औरंगाबादसह तीन जागा लढणार
इम्तियाज जलील यांच्यावर टीका, म्हणाले काँग्रेस पाॅलिसीसारखी वागणूक राहीली तर मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला न्याय कसा मिळणार....
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया(SDPI)
महाराष्ट्रातील तीन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार आहे. यामध्ये औरंगाबाद, परभणी, साऊथ सेंट्रल मुंबई या मतदारसंघातून पक्षाने निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते चार ते पाच दिवसांत उमेदवारांची घोषणा करणार आहे. पक्षाचे उमेदवार इमानदार, संविधानवादी व सर्वधर्मसमभाव मानणारे व विकासाचा एजंडा असणारे असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांनी दिली आहे.
यावेळी प्रदेश सदस्य साजिद पटेल, जुबेर पहेलवान, जिल्हा सरचिटणीस शेख नदीम उपस्थित होते.
विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यावर त्यांनी यावेळी हल्लाबोल केला. अगोदर औरंगाबाद नामांतराविरोधात त्यांनी आवाज बुलंद केला नंतरच्या काळात या विषयावर ते काही बोलले नाही. मुस्लिम आरक्षणावर त्यांनी भुमिका स्पष्ट केली नाही. मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झाले तेव्हा त्यांचे धोरण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सारखे दिसून आले. ज्यावेळी अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना काँग्रेसचे नेते बोलायला तयार नाही तशी परिस्थिती इम्तियाज जलील यांची झाली असा आरोप कलिम यांनी यावेळी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले किराडपूरा दंगलित एसडिपिआयने आवाज उठवला. रस्त्यावर उतरुन न्याय हक्कासाठी एसडिपिआय काही वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत आंदोलन करत आहे. पक्षाचा एजंडा संविधानानुसार विकासाची कामे करण्याचा आहे. सत्ताधारी व विरोधीपक्ष समाजात तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजून राजकारण करत आहे. भाजपा काँग्रेस एक नान्याचे दोन बाजू आहेत. एसडिपिआय सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करत आहे. विकासाच्या मुद्यावर कोणी चर्चा न करता निवडणुकीत उतरणार असे दिसून येत आहे. मतांचे राजकारण करत आहे. आम्ही इमानदारीने जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात मजबूत उमेदवार देणार आहे. जनतेचा आम्हाला आशिर्वाद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?