तयारी लोकसभेची, महाविकास आघाडीने घेतली परिचय बैठक, एकदिलाने काम करण्याचा निर्णय

 0
तयारी लोकसभेची, महाविकास आघाडीने घेतली परिचय बैठक, एकदिलाने काम करण्याचा निर्णय

तयारी लोकसभा निवडणुकीची...

महाविकास आघाडीची बैठक संपन्न, घेतली जिल्हास्तरीय परिचय बैठक...

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार एकत्र लढविण्यात येणार आहेत स्थानिक स्तरावर सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने निवडणुकीत उतरण्यासाठी शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे शहरातील पदाधिकारी यांची जिल्हास्तरीय परिचय बैठक घेतली.

अगोदर वरिष्ठ पातळीवर जसे सर्वजण एकत्र आले त्यानुसार स्थानिक स्तरावर सर्वांनी एकत्रित येऊन अनेक विषयावर चर्चा करणे काळाची गरज आहे. महाविकास आघाडी धर्म म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत आगामी काळातील वाटचाली संदर्भात आयोजित परिचय बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन मुल्ला, काँग्रेस कमिटी शहर जिल्हा अध्यक्ष युसुफ शेख,

शिवसेना महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष विना खरे, काँग्रेस कमिटी महिला शहर जिल्हाध्यक्ष दिपाली मिसाळ, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात विश्वनाथ स्वामी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, सचिन जव्हेरी, अनिल पोलकर, गणू पांडे, किशोर कछवा, सुदाम सोनवणे, संतोष जेजुरकर, सुधीर नाईक, नंदकुमार घोडेले, बप्पा दळवी राजू राठोड, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, राजू वैद्य, उपशहर प्रमुख योगेश अष्टेकर, मकरंद कुलकर्णी, लक्ष्मीनारायण बाखरिया, राजू दानवे, समीर कुरेशी ,अनिल जयस्वाल, शेख रब्बानी, चंद्रकांत इंगळे ,शिवा लुंगारे ,विलास राऊत ,इकबाल काजी , सुगंधकुमार गोडवे, दिग्विजय शेरखाने, संजय हरणे, संदेश कवडे, नारायण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्धव बनसोडे, इरफान शेख, इमरान उल हक, आश्रफ पठाण, मोहम्मद ताहीर, आप्पा पगारे, सुनील खोतकर, अजहर, मा.नगरसेवक सय्यद मतीन, चंद्रप्रभा खंदारे, इंदुताई खरात, काँग्रेस कमिटीचे डॉ.पवन डोंगरे, सुरजित सिंग गुलाटी, रवी लोखंडे, मंजू लोखंडे, प्रवीण देशमुख, रुबीना सय्यद, नागमा सिद्दिकी, अखिल शेख, गणेश जाधव आदी सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow