जिल्हाधिकारी यांची कन्नड भेट, जलसंधारण कामे व निवडणूक पूर्व तयारीचा घेतला आढावा

 0
जिल्हाधिकारी यांची कन्नड भेट, जलसंधारण कामे व निवडणूक पूर्व तयारीचा घेतला आढावा

जिल्हाधिकाऱ्यांची कन्नड येथे भेट:

जलसंधारण कामे व निवडणूक पूर्व तयारीचा घेतला आढावा

कन्नड, दि. 10(डि-24 न्यूज) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड तालुक्यास भेट देऊन जलसंधारण उपाययोजना, कामे व निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

उपजिल्हाधिकारी सामान्य प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, तहसिलदार कन्नड विद्याचरण कडवकर, नायब तहसिलदार मनोज बारवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी ठाकूरवाड आदी अधिकारी - कर्मचारी त्यांचे समवेत उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज मौजे हतनूर येथे मग्रारोहयो अंतर्गत विहीर पुनर्भरण कार्यक्रम तसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीकडे या संकल्पनेतून आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेने विकसित केलेले जलतारा स्ट्रक्चर चे उदघाटन केले. मग्रारोहयो अंतर्गत राज्यात प्रथमच जलतारा स्ट्रक्चर चे काम कन्नड तालुक्यात करण्यात येत आहे. त्यामुळे मोठा पाऊस पडल्यावर पाण्याचा लगेच निचरा होतो. भूगर्भात पाणी पातळी वाढते. तसेच कृषिभूषण संतोष जाधव यांचे शेतास भेट देऊन पाहणी केली.

निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतांना त्यांनी हतनूर येथील मतदान केंद्रास भेट दिली. तसेच तहसिल कार्यालय कन्नड येथे लोकसभा निवडणूक - 2024 संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवणेसाठी करावयाची जनजागृती, दिव्यांग मतदारांना रॅम्प व्हील चेअर, पोस्टल मतदान ई. सुविधा पुरविणे, मतदान केंद्रावर पाळणाघर इ. सुविधा पुरविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच कन्नड 

 

शहरातील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे भेट देऊन तेथील मतदान केंद्र, शिवाजी महाराज महाविद्यालय कन्नड येथील नियोजित ईव्हीएम स्ट्रॉग रूम पाहणी, साहित्य वाटप स्विकृती स्थळ इ. पाहणी करण्यात आली.

उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीपर उपाययोजना राबवाव्या. तसेच याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक उपययोजनाबाबत सूचना दिल्या. पाणी टंचाईबाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना उपलब्ध पाण्याचे काटकसरीने वापर करणेबाबत सूचना दिल्या.

 

जिल्हाधिकारी स्वामी यांनी नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे भेट देऊन ई-ऑफीस द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून कार्यप्रणालीची

सुरुवात केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow