दलित चळवळीतील नेते शब्बू लखपती यांचे दु:खद निधन, उद्या सकाळी दफनविधी
 
                                दलित चळवळीतील नेते शब्बू लखपती यांचे दु:खद निधन, उद्या सकाळी दफनविधी
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) दलित चळवळीतील नेते शेख बशीर उर्फ शब्बू लखपती(वय 49) यांचे शनिवारी, 17 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे चाहते व नातेवाईकांनी रोहीदास पुरा, शबनम नगर, जुना मोंढा येथे गर्दी केली होती.
उद्या सकाळी 10.30 वाजता जाफर गेट, कल्याण शहा मस्जिद येथे नमाज-ए-जनाजा होईल तेथील कब्रस्तानात दफनविधी होईल अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
शब्बू लखपती यांनी दलित संघटनेत व विविध पक्षांमध्ये काम करुन गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवनभर संघर्ष केला अशी प्रतिक्रिया त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत. दलित चळवळीतील नेत्यांसोबत सामाजिक कार्यात ते नेहमी पुढे असत.
त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, 4 मुली, एक मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            