राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा सत्कार

 0
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा सत्कार

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी (दि.६) सत्कार करण्यात आला.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बजाज अध्ययन संकूल येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. अविंद गायकवाड, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. भरत सोनवणे, डॉ. बालाजी गोरे, डॉ. वैशाली उणे, डॉ. गायत्री तडवलकर तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर्स आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी व अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी श्री. वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असतांना केलेल्या कार्याची आठवण सांगून त्यांच्या कार्यकाळातील रुग्णहिताच्या निर्णयांची व उपक्रमांच्या आठवणी सांगितल्या.

श्री. वाघमारे यांनी प्रशासकीय सेवेतून शोषितांच्या सेवेची संधी मिळाली. ही सेवा आपण केली. सेवा ही नम्र भावनेने केली, अशा शब्दात आपल्या भावना सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केल्या.

प्रास्ताविक डी.जे.वाकोडे यांनी केले. सुत्रसंचालन अक्षता अंभारे यांनी तर डॉ. काशिनाथ राऊळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow