एशियन हाॅस्पिटलचे सामाजिक उपक्रम, पोलिस ठाण्यात फर्स्ट एड किटचे वितरण
 
                                एशियन हाॅस्पिटलचे सामाजिक उपक्रम, पोलिस ठाण्यात फर्स्ट एड किटचे वितरण
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) समाजाच्या सुख दु:खात नेहमी धावून जाणारे पोलिस बांधव 24 तास कर्तव्य बजावतात. यादरम्यान कधी धावपळीत चुकुन जखम झाल्यास उपचार घेत नाही याची दखल एशियन हाॅस्पिटलचे संचालक डॉ.शोएब हाश्मी यांनी घेतली.
प्रत्येक पोलिस ठाण्यात फर्स्ट एड किट देण्याचे त्यांनी ठरवले त्यानुसार एशियन हाॅस्पिटलचा सामाजिक उपक्रम म्हणून संचालक डॉ शोएब हाश्मी यांनी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्याकडे किट सुपुर्द केल्या.
याप्रसंगी एपिआय विवेक जाधव, अॅड हर्षवर्धन त्रिभुवन, सतीश सातपुते, पंकज गुंजर्गे, शेख इम्रान, विशाल झिने आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            