पतंग व व्यसनाचे दुष्परिणाम, दामिनी पथकाची पथनाट्याने शहरात जनजागृती
पतंग व व्यसनाचे दुष्परिणाम, दामिनी पथकाची पथनाट्याने शहरात जनजागृती
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) पोलिस स्थापना दिवसानिमित्त शहरात विविध विषयी समाजात जनजागृती करण्यासाठी 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पथनाट्य सादर करुन संदेश दिला जात आहे.
पतंगविषयी व व्यसनाचे दुष्परिणाम, वाहतूकीचे नियमांचे पालन करावे, मुलिंची छेडछाड झाल्यावर पोलिस हेल्पलाईन नंबर, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्यावर, निर्जनस्थळी सार्वजनिक स्थळी वाढदिवस साजरा न करता असभ्य वर्तन करु नये या ज्वलंत विषयावर दामिनी पथकाने पथनाट्य सादर केले.
दामिनी पथक प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक तेजश्री पाचपुते, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कांचन मिरधे, निर्मला निंभोरे, रुपा साधला, सोनाली निकम, अयोध्या दौंड, मनिषा बनसोडे, प्रणिता साळवे, शुक्ला सर, शिवा ट्रस्टचे श्रध्दा मोतीयले, कोमल बच्छीरे, प्रतिभा पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार चौक, पुंडलिक नगर, सिडको बसस्थानक, हर्सुल टि पाॅईंट, कॅनाॅट प्लेस येथे शिवा ट्रस्ट नर्सिंग काॅलेजच्या 50 विद्यार्थ्यांनी पथनाट्यात सहभाग घेतला.
What's Your Reaction?