तबलिगि इज्तेमा दुसरा दिवस... अल्लाह व पैगंबरने दाखवलेल्या मार्गावर चालाल तर यशस्वी होणार

तबलिगि इज्तेमा दुसरा दिवस....
अल्लाह व पैगंबरने दाखवलेल्या मार्गावर चालाल तर यशस्वी होणार...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) इस्लाम धर्म हा जगाला मानवतेचा व शांतीचा संदेश देणारा धर्म आहे. जगाच्या स्थापनेनंतर परलोकाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक जो अल्लाह आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर(स.अ.व.स.) यांनी दाखवलेल्या मार्गावर चालेल तो यशस्वी होईल. जो अल्लाह व पैगंबरने दाखवलेल्या मार्गापासून दूर जाईल आणि त्याचे पालन करणार नाही तो नर्कात(जहान्नम) मध्ये जाईल. त्याच्या इच्छेनुसार आणि अल्लाह तुम्हाला ज्या मार्गाचा अवलंब करायचा आहे तो अयशस्वी होईल. अल्लाह यामुळे दयाळु कृपाळू होणार नाही. तुम्ही अल्लाह रसूलला मित्र बनवले तर तुम्ही जगात आणि परलोकात यशस्वी व्हाल. विश्वास आणि धार्मिक शिकवण हि तुमची दावत आणि तब्लिग आहे. हराम खावू नका कष्टाने कमावलेले खावे. कोणावरही दया करा इतरांशी चांगले वागा व आपले व्यवहार इमानदारीने करा. जग हि तुमच्यासाठी परीक्षा आहे तुम्ही ऐश आरामसाठी जगात पाठवले नाही तर अल्लाहच्या इबादतसाठी पाठवले आहे. वाईट सवई व खोटे बोलू नका कोणावरही अन्याय करु नका. कुराणमध्ये दाखवलेल्या मार्गावर चालून अंमलबजावणी करा तरच स्वर्ग मिळेल. कुरआनचे अर्थ समजून वाचा व आपल्या मुलांना शिकवा. कोणाचे मन दुखावू नका. तबलिग म्हणजे अल्लाहचे वचन ह्रदयात पोहचवणे. तुम्ही इतरांवर दया करा तुमच्यावर अल्लाह दया करेन. प्रामाणिकपणे आणि सत्याने व्यवसाय करा आशिर्वाद वाढतील. वाईट करणा-यांना माफ करा. मस्जिद आबाद करुन पाच वेळची नमाज नियमितपणे पठण करावे. अल्लाह तुमच्यावर दया करेन. असे मार्गदर्शन आज बाद नमाज मगरीब तब्लिगी इज्तेमाच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली मर्कजचे मौलाना अल्तमश यांनी केले. यावेळी जिल्ह्यातून हजारोंचा मुस्लिम बांधवांचा जनसमुदाय उपस्थित राहुन बयान ऐकत होते. उद्या शेवटच्या दिवशी सामुहिक विवाह सोहळा व दुवाचे आयोजन बाद नमाज मगरीब होणार आहे.
What's Your Reaction?






