बेगमपुरा पोलिस व माणूसकी समुहाने महिलेला दिला मायेचा हात

 0
बेगमपुरा पोलिस व माणूसकी समुहाने महिलेला दिला मायेचा हात

बेगमपुरा पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला 29 वर्षीय महिलेला दिला मायेचा हात माणुसकी वृध्द सेवालय येथे पुनर्वसनासाठी केले दाखल

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे मदतकार्य...

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज)

आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की जीव कासाविस होतो. रात्री अपरात्री काही झालं तर ? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते. घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते. पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या वातावरणात कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात; ती कुणाची तरी आई, मुलगी, अथवा पत्नी, किंवा बहीण असेल. पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही. अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे. कारण त्या आजारी आहेत मनोविकृत आहेत. बेगमपुरा शहर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री घाटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घरचे सांभाळत नाहीत म्हणून एक महिला विपन्न अवस्थेत फिरत होती, पोलीसांनी तीची विचारपूस केली असता ती रडायला लागली माझी मदत करा ? पोलीसांनी तीला बेगमपुरा पोलीस स्टेशन आणले व पोलीस उप निरिक्षक शेख यांनी महिलेची विचारपुस केली असता तीने आपली आपबीती सांगितली. आम्ही आंबोली शहाड कल्याण मुंबई येथे राहत होतो माझे आई वडील मयत आहे वडिलांनी लहानपणी लग्न लावून दिले होते परंतु लग्नानंतर काही दिवस नवऱ्याने सांभाळले आम्हाला एक मुलगाही झाला व नवऱ्याने फारकती दिली , मला सांभाळणारे दुसरे कोणीही नव्हते माझी बहीण मयूर पार्क येथे ओरिएंटल शाळेजवळ राहते परंतु तिने देखील मला सांभाळण्यास नकार दिला व माझ्या पाच वर्षाच्या मुलाला ती सांभाळते मी गेल्या दोन वर्षापासून इकडे तिकडे भरकटत फिरते व रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या मदतीने सहारा घेऊन तिथे झोपते मी गेल्या एक वर्षात रेल्वेने पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला परंतु खूप भीती वाटत असे , की बाहेर एकट्या महिलेने कसं राहायचं म्हणून आज साहेब तुम्ही माझी मदत करा असे सांगून पोलिसांना तिच्यावर घडलेली आपबीती सांगितली असता पोलीसांनी त्या महिलेची चौकशी केली असता. पोलीसांनी मयुरपार्क येथे तीच्या बहिणीच्या घरी घेवून गेले असता तीच्या बहिणीने पोलीसांना स्पष्ट नकार दिला की मी हिला सांभाळून शकत नाही तुम्ही बघा तीचे काय करायचे ते व तीच्या बहिणीच्या सांगण्यावरुन ही एक बेवारस निराधार महिला आहे हे पोलीसांच्या लक्षात आले. व पुनर्वसनासाठी कुठल्या समाजिक संस्थेचे स्वयंसेवक काम करतात का , त्यात पोलीसांनी सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्ण समूहाचे सामाजसेवक श्री सुमित पंडित यांचे नाव पुढे आले त्यांना माहिती दिली, असता सुमित पंडित यांनी त्या महिलेला पुनर्वसना साठी कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण करुन व शासकीय रुग्णालयात सायाक्राटिक्स विभाग व प्रथोमपचाराकरीता घाटी दवाखान्यात दाखल केले. व मेडिकल करुन समाजसेवक सुमित पंडित यांनी आपले माणुसकी वृध्द सेवालय येथे पुणर्वसनासाठी नेण्याचे ठरवले,व माणुसकी वृध्दाश्रम येथे पुणर्वसनासाठी मदतकार्य केले. या सामाजिक कार्यात रामेश्वर गाडे पोलीस निरीक्षक बेगमपुरा, हरेश्वर घुगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक हारून शेख, विनोद भालेराव, पोलीस उप निरीक्षक, गजानन तुपे, प्रवीण बोदवडे, प्रकाश मानवते

पोलीस हवालदार, भाग्यश्री वानखेडे, स्वाती वानखेडे,

महिला पोलीस शिपाई सर्व पोलीस स्टेशन बेगमपुरा व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित,

समाजसेवीका पुजा पंडित

आदींनी मेहनत घेतली.

-----------------------------

एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन बेवारस महिलेला दिला न्याय

एक सामाजिक दायित्व व कर्तव्य स्वीकारणारे याचं उत्तर माणुसकी शिवाय दुसरं काय असेल. ती महिला मानसिक आजाराने पीडित आहेत. हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरीक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा ? प्रश्न ह्या एका महिलेचाच नाही, तर अजून कितीतरी असतील. ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेशुद्ध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर.

मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगून येत नसतात. आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला, जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत. तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.

       ----रामेश्वर गाडे पोलीस निरीक्षक बेगमपुरा

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow