हर्सुलकर अतिक्रमण कारवाई विरोधात बसले उपोषणाला, आधी मोबदला नंतर कार्यवाई करण्याची मागणी...
हर्सुलकर अतिक्रमण कारवाई विरोधात बसले उपोषणाला, आधी मोबदला नंतर कार्यवाई करण्याची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)-: हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी लॉन्स मनपा हद्दीपर्यंतच्या रस्त्या रुंदीकरणात मालमत्ता बाधित होणार आहे.
आज पैठण गेट येथून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा कार्यवाई सुरू केली आहे. उद्या 20 नोव्हेंबर रोजी पडेगाव येथील एमजीएम गोल्फ कोर्स व यानंतर हर्सुल येथे 21 नोव्हेंबर रोजी कार्यवाई करणार असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे. हर्सुल येथील मालमत्ताधारकांना अगोदर मोबदला द्यावा, नंतरच भूसंपादन करून रस्ता रुंदीकरण मोहिम राबवावी, अशी मागणी करत आज बुधवारी (दि.19) हर्सूलवासिंयानी गावातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले.
कारवाई करण्यापूर्वी मोबदला देण्याची मागणी करत हर्सूलवासियांनी लोकशाही मार्गाने मनपाच्या कारवाई विरोधात लढा सुरू केला आहे. बुधवारी सायंकाळपासून हिम्मतलाल शेळके, युनूस पटेल, जावेद सिद्दीकी, काशीनाथ बकले, सुरेश औताडे हे 5 जण उपोषणाला बसले आहेत, तर नरेंद्र औताडे, बाळासाहेब औताडे, संजय औताडे, संजय हरणे, अनिस पटेल, शेखलाल पटेल, नरेंद्र औताडे, माधव वाणी, संजय भगुरे, अकुश औताडे, कल्याण औताडे, गणेश औताडे यांच्यासह गावातील सर्व 110 मालमत्ताधारक आणि गावकरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले आहेत.
निवेदनात या मागण्या आहेत...
हर्सूलमधील मालमत्ता रस्ता रुंदीकरणा बाधित होत असून, आधी या मालमत्ताधारकांना मोबदला द्यावा. त्यानंतर रस्ता रुंदीकरण करावा. हनुमान मंदिर ट्रस्टची शंभर टक्के जागा जात असून, मंदिराला सर्वे नंबर 204 मध्ये 1 एकर जागा देण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची आणि बुद्धविहारची भूसंपादनात शंभर टक्के जागा जात असून, त्या बदल्यात सर्वे नंबर 165 मध्ये 1 एकर जागा द्यावी. सर्वे नंबर 1 मुस्लिम कब्रस्थान 60 आर जागा जात आहे. त्याबदल्यात गट नंबर 202 मध्ये कब्रस्थानसाठी 3 एकर जागा द्यावी. जामा मस्जिद, अकसा मस्जिद, दर्गा आदींच्या 50 टक्के जागा जात आहेत. शासनासोबत सर्व मस्जिद कमिटीशी चर्चा करून समाधानकारक तोडगा काढावा, जोपर्यंत वरील सर्व मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
उपोषणस्थळी गावकरी बाळासाहेब मच्छिंद्र औताडे, संजय तुकाराम औताडे, संजय हरणे, अनिस करीम पटेल, शेकलाल पटेल, नरेंद्र औताडे, माधव नारायण वाणी, संजय भगुरे, फारुक पटेल, जावेद पटेल, अकुश औताडे, कल्याण औताडे, गणेश औताडे, नासेर पटेल, सुभाष हरणे, दत्तू औताडे, आप्पा औताडे, नजीम पठाण, साबेर पटेल , अनिस अन्वर पटेल, लक्ष्मण दुबे, रामदास सुरे, अजहर पठाण, नदीम पटेल, अजहर अहमद पटेल, मुसा पटेल, जगन्नाथ राठोड, गजेश्वर औताडे, अशोक औताडे, सुभाष वाघमारे, अशोक जैस्वाल, रतन बडोदे, भास्कर औताडे, जगन राठोड, सतीश इंगळे, इरफान शेख, प्रमोद औताडे, सोमनाथ राठोड, दिलीप सुरे, संतोष रोठे, रमेश सुरे, संदीप भगुरे, प्रवीण खरात ,यूनुस अनवर पटेल, जावेद शेख, विजय तांदळे , वाजेद पटेल, आरेफ पटेल, तबरेज पटेल, बाबा सेठ, बाळू भाऊ खंडेराव औताडे, सत्तार पटेल, सोहेल पठाण, शोएब पठाण, चाँद पठान, मंसूर पठान, अजिम पठाण, जब्बार पटेल, साजिद पठाण, साईनाथ औताडे, भाऊसाहेब औताडे, सुधाकर हरसुलकर सर्व उपस्थित होते.
What's Your Reaction?