शहरात 16 हजार बोगस जन्म प्रमाणपत्र असल्याचा किरीट सोमय्या यांच्या आरोपाने खळबळ...
शहरात 16 हजार बोगस जन्मप्रमाणपत्र वाटप - भाजपा नेते किरीट सोमय्या
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सन 2024 आणि 2025 मध्ये 16 हजार नावे जुन्या रेकॉर्डमध्ये वाढविण्यात आली आहेत ते सर्व रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. आतापर्यंत फक्त 200 लोकांचीच नावे आरोपी म्हणून आली आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. सोमवारी अचानक त्यांनी महापालिकेत इंट्री केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी त्यांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेतली.
बैठकीनंतर सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, महापालिकेतून 700 बोगस जन्म प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत. तर मागील दोन वर्षात तब्बल 16 हजार संशयित प्रमाणपत्र वाटप झाले आहेत. या प्रमाणपत्रांची चौकशी करून ते जन्म प्रमाणपत्र रद्द करावे, बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी महापौरांकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून तीन महिन्यात कारवाई करण्याचे तसेच प्रत्येक महिन्यात आढावा घेण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील मोहळा गावात 1300 लोकसंख्या असताना 3447 जन्मनोंदणी झाल्याचे समोर आलेले आहे, हि नोंदणी मे 2025 ते नोव्हेबर 2025 या दरम्यान झालेली आहे, त्यातील एकही नाव इथले नाही. अशाच प्रकारे संभाजीनगर शहरात नोंदणी झाल्याची शक्यता आहे. जुन्या रेकॉर्डमध्ये वाढविलेली 16 हजार नावे तपासण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. आतापर्यंत 10 हजार लोकांना आरोपी बनविण्यात आले आहे. या प्रकरणात संभाजीनगर महानगरात प्रगती झाली आहे, परंतू सिल्लोड येथे काहीही काम झालेले नाही, 1100 बोगस आदेश दिले गेले आहेत, त्यावर कारवाई होईल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?