समृध्दी महामार्गाने घेतला पुन्हा 12 जणांचा बळी, नाशिक जिल्ह्यात शोककळा, जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार

 0
समृध्दी महामार्गाने घेतला पुन्हा 12 जणांचा बळी, नाशिक जिल्ह्यात शोककळा, जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार

समृध्दी महामार्गाव अपघातात 12 जणांचा दुर्देवी मृत्यू, 23 जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर

मृतकांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख तर पंतप्रधानांनी दोन लाख देण्याची घोषणा...जखमींवर सरकार करणार उपचार, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी... मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी घटनेबद्दल केले दु:ख व्यक्त , नाशिक जिल्ह्यात शोककळा 

वैजापूर, दि.15(डि-24 न्यूज) समृध्दी महामार्गावर मृत्यूचे तांडव अजून सुरुच आहे बुलढाण्यानंतर वैजापूर नजीकच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ रात्री 12 ते 12.15 वाजेदरम्यान एका उभ्या ट्रकला टेम्पो ट्राव्हेलरने जोरदार धडक दिली या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी 23 जणांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात व वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेकरू सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन नाशिक निफाडकडे जात होते. अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

घटनेची तात्काळ माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना पाच लाख व पंतप्रधान यांनी दोन लाख देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमींचे पूर्ण उपचार केले जातील. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती डि-24 न्यूजला दादा भुसे यांनी दिली आहे.

दादा भुसे, पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांनी घाटी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली व योग्य उपचार करण्याचे आदेश दिले. कुटुंबातील व्यक्तींची भेट घेऊन त्यांनी धीर दिला.

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही घटनास्थळी धाव घेतली व घाटी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. 

ट्रक उभी असताना हा अपघात घटला आहे तर टेम्पो ट्राव्हेलरची आसनक्षमता 17 असताना 35 ते 38 यात्रेकरू बसवण्यात आले यासाठी परिवहन अधिकारी जवाबदार आहे. हफ्तेखोरीसाठी वाहनांची तपासणी केली जात नाही दोषी परिवहन अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी दानवेंनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मृत्यूचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा अशी अजब मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

या घटनेची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मृतकांची नावे...

दिलिप प्रभाकर केकाणे(वय 47), रा.पिंपळगाव, जिल्हा नाशिक, संगीता विलास अस्वले(40), रा‌.वणासगाव, निफाड, तनुश्री लखन सोळसे(5), या.समतानगर, नाशिक, कांताबाई रमेश जगताप (38), रा.राजूनगर, नाशिक, रतन जमधडे(45), रा.कबीरनगर, नाशिक, काजल लखन सोळसे(32), समतानगर, नाशिक, रजनी गौतम तपासे(32), गवळणी, नाशिक, हौसाबाई आनंदा सिरसाट (70), उगाव, ता.निफाड, जि‌.नाशिक, झुंबर काशिनाथ गांगुर्डे (50), राजु नगर, नाशिक, अशोक झुंबर गांगुर्डे (18 ), राजु नगर , नाशिक, संगिता झुंबर गांगुर्डे (40), राजु नगर , नाशिक, मिलिंद पगारे (50), कोकणगाव आडेसर, ता.निफाड, 

अपघातात जखमी झालेल्यांची नावे...

पुजा संदीप अस्वले(वय 35), गांधीनगर, नाशिक, वैष्णवी संदीप अस्वले (12), गांधीनगर नाशिक, ज्योती दिपक केकाणे(35), पिंपळगाव, नाशिक, कमलेश दगु म्हस्के (22), राहुल नगर , नाशिक, संदीप रघुनाथ अस्वले (38), तिरुपती नगर, नाशिक, युवराज विलास साबळे(18), इंदिरानगर, नाशिक, कमलाकर छबु म्हस्के (77), ममदापूर, नाशिक, संगीता दगडू म्हस्के (60), गांधीनगर, नाशिक, दगु सुखदेव म्हस्के (50), गांधीनगर नाशिक, लखन शंकर साळसे(38), समतानगर नाशिक, गिरजेखरी संदीप अस्वले (10), राहणार नाशिक, शांताबाई नामदेव म्हस्के (40), गांधीनगर नाशिक, अनिल लहानू साबळे( 32), गांधीनगर नाशिक, तन्मय लक्ष्मण साबळे (8), पिंपळगाव, निफाड, सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन (25), या.वैजापूर, श्रीहरी दिपक केकाणे (12) पिंपळगाव या.निफाड, सम्राट दिपक केकाणे (6), पिंपळगाव, या.निफाड यांच्यावर घाटी रुग्णालयात व वैजापूर येथे उपचा

र सुरू आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow