देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाला प्रतिसाद
देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाला प्रतिसाद...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज): कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने आज स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतील उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
9 जानेवारीपासून विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संस्थेतून यशस्वी उद्योजक होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष गर्दे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी रूचा इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक उमेश दाशराथे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता रंगनाथ चव्हाण, संस्था व्यवस्थापन समितीचे दुष्यंत आठवले आणि डॉ निखिल आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित उद्योजक, पालक आणि प्रशिक्षणार्थी यांना मासिआ उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, प्रादेशिक कार्यालयाचे लेखाधिकारी शरद भिंगारे आणि युवा आयाम प्रमुख लखन अवस्थी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपसंचालक प्रदीप दुर्गे यांनी, सूत्रसंचालन उपप्राचार्य दिलीप वानखेडे तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य सत्यभूषण गोसावी यांनी केले. प्रसंगी उपस्थित १५० हून अधिक माजी विद्यार्थी तथा यशस्वी उद्योजक, उच्च पदस्थ यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे उपप्राचार्य रंगराव बुलबुले, प्रबंधक ज्ञानेश्वर केदारे आणि विविध औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेत
ले.
What's Your Reaction?