शिवसेना सोडू नका... उध्दव ठाकरेंची साथ सोडू नका... चंद्रकांत खैरेंचे शिवसैनिकांना दंडवत करत आवाहन
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मेळावा संपन्न
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांचे प्रमुख मार्गदर्शन
स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज):
स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर अधिक प्रेम होते तसेच उध्दव ठाकरे यांनीही प्रेम देत अनेकांना पदे देऊन मोठे केले. काहींनी गद्दारी केली. शहरातील जनतेने शिवसेनेला नेहमी आशिर्वाद दिल्याने सर्वाधिक महापौर शिवसेनेचे झाले. शिवसेना(उबाठा) सोडू नका भावनिक साद देत उध्दव ठाकरे यांची साथ सोडू नका असे आवाहन जिल्हा मेळाव्यात करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना दंडवत घातला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा शनिवार, ता. 11 जानेवारी रोजी मेळावा संपन्न झाला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकविण्याचा यावेळी एकमुखाने निर्धार करण्यात आला.
शहरातील संत एकनाथ रंग नाट्यमंदिर येथे संपन्न झालेल्या मेळाव्याची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली.तदनंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले. माजी आमदार उदयसिंग राजपूत, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,दिनेश परदेशी, राजू शिंदे, दत्ता गोर्डे, महिला आघाडी जिल्हा संघटिका आशा दातार व युवासेना युवा जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तुटकळ पैशांच्या अमिषापोटी काही पदाधिकाऱ्यांनी आपले इमान गद्दार गटाच्या हाती विकले आहे. दोन वेळेस एकाच घरात संभाजीनगर महानगरपालिकेसारख्या महत्त्वपूर्ण महानगरपालिकेचे महापौर पद दिलेल्या माजी महापौराने शिवसेनेशी गद्दारी केली. मंत्री संजय शिरसाट यांची गुलामी करण्यासाठी या महापौराने शिवसेना सोडली असल्याची टिका करत शिवसेना सोडणाऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे सांगत पक्षांतर करणाऱ्याचा चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत वाटलेला आम्हा पैसा कुठून आणला ? असा प्रश्न देखील खैरे यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसैनिकांनी परिपक्वतेने खोट्या पक्षांतराच्या बातम्या समजून घेतल्या पाहिजे,माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.सर्वसामान्य शिवसैनिकांपासून ते मोठमोठ्याल्या पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या शिवसेनेशी गद्दारी करण्याची हिंमत कोणीच करु शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत शिवसेनेशी गद्दारी केलेले लोकं मुख्यमंत्री झाले. परंतू जनमानसात त्यांना कधीच सन्मान मिळू शकणार नसल्याचे, वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाने हिंदुत्व सोडल्याचे एक तरी उदाहरण दाखवावे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे देशातील प्रथम असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी राज्याच्या विधान भवनात हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या प्रचारासाठी घरोघरी गेले. विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता ते जातील का ? हे बघावे. संघाचे लोक आता थेट पुढच्या विधानसभा निवडणुकीला बाहेर येतील, अशी भूमिका दानवे यांनी यावेळी मांडली.
शिंदे गटाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्थिक अमिषापोटी पदाधिकारी शिवसेनेला सोडून जात आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामान्य माणसे मोठे केले आहे. मात्र, गद्दार गटाने ही जाणीव कधीच ठेवली नाही. आगामी काळात सत्ताधारी एकमेकांचेच पाय ओढणार असल्याची, भावना उदयसिंग राजपूत यांनी यावेळी व्यक्त केली.
राजु शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले खचून जाऊ नका. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी केली. आपण महापालिकेच्या निवडणुका जिंकू यासाठी एकजूट दाखवा. महापालिकेची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी सोबत न लढता स्वबळावर लढावे. या दोन पक्षांचा विधानसभा निवडणुकीत फायदा झाला नाही उलट नुकसानच झाले. मौलाना सज्जाद नोमानी यांच्या भुमिकेमुळे हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र आले हेहि पराभवाचे कारण ठरले.
याप्रसंगी राज्य संघटक चेतन कांबळे, महानगरप्रमुख राजू वैद्य, सुभाष पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, कृष्णा पाटील डोणगावकर, अविनाश पाटील, अशोक शिंदे, लक्ष्मण भाऊ सांगळे, अंकुश सुंभ, विठ्ठल बदर, संतोष जेजुरकर, शिवा लुंगारे, आनंद तांदुळवाडीकर, अरविंद धिवर, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, शहर संघटक सचिन तायडे, तालुकाप्रमुख संजय मोटे, शंकर ठोंबरे, सुभाष कानडे, सचिन वाणी, आनंद भालेकर, रघुनाथ घारमोडे, राजू वरकड, सुदाम सोनवणे, गिरिजाराम हाळनोर, मुरली चौधरी, बाबासाहेब मोहिते, युवासेना उपसचिव ऋषी खैरे, सहसचिव ॲड धर्मराज दानवे, हनुमान शिंदे, विठ्ठल डमाळे पाटील, उमेश मोकासे, शुभम पिवळ, माजी महापौर शिलाताई गुंजाळ, महिला आघाडी संपर्कसंघटिका सुनिता आऊलवार, सुनिता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटिका आशा दातार, लता पगारे, राखी परदेशी, महानगर संघटक मीना फसाटे, सुकन्या भोसले, शहर संघटक वैशाली आरट, सुनिता औताडे, सुनिता सोनवणे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, सुनंदा खरात, नलेनी महाजन, नलेनी बाहेती, रजनी जोशी, अनिता डहारिया, संगीता बनकर, मीरा चव्हाण, रेणूका जोशी, तालुका संघटिका अर्चना सोमासे, रुपालीताई मोहिते, व सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, मनपा, जि.प, पं. स, न. प, आजी माजी लोक्रतिनिधी व महिला आघाडी व युवासेना व सर्व अंगीकृत संघटनेचे जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या मेळाव्याचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर व शहर संघटक सचिन तायडे तर आभार प्रदर्शन शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डो
णगावकर यांनी मानले.
What's Your Reaction?