अजित पवार गटाचे नेते संपर्कात - जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील
अजित पवार गटाचे नेते संपर्कात - जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील
आमदार रोहीत पवार यांनीही 18 ते 19 आमदार संपर्कात असल्याचे सांगत खळबळ उडाली आहे....
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते कार्यकर्ते संपर्कात आहेत. लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वरिष्ठांची परवानगी घेऊन हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी भवनात होणार आहे. भाजपा, बिआरएस व शिंदे गटाचेही नेते कार्यकर्ते प्रवेशासाठी संपर्क करत आहे. पक्षाच्या वतीने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे यासाठी 11 जून पासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. 10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन साजरा केल्यानंतर तालुका पातळीवर तालूकाध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे.
27 मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी, बोगस बी-बीयाणे, बोगस रासायनिक खते विकणा-या दुकानदारांवर कडक कारवाई करुन ओरीजिनल खते औषधी तात्काळ मुबलक उपलब्ध व्हावे, पिक कर्ज पुनर्गठन करावे, पीक कर्ज तात्काळ उपलब्ध करावे, कर्ज वसूलीस स्थगिती द्यावी, पिक विमा द्यावे, विजबिलात सूट द्यावी , वसूलीस स्थगिती द्यावी, विजपुरवठा खंडीत करु नये अशी मागणी केली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी दिली आहे.
यावेळी कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष शेख शफीक उपस्थित होते.
What's Your Reaction?