मोईन शेख हर्सुलकर यांची अखेर शहर उपाध्यक्ष पदावर वर्णी...

मोईन शेख हर्सुलकर यांची अखेर शहर उपाध्यक्ष पदावर वर्णी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - काँग्रेस पक्षात 20 ते 25 वर्षांपासून एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते मोईन शेख हर्सुलकर यांना पद देण्यासाठी अंतर्गत गटबाजीमुळे ताटकळत ठेवले जात होते तरीही त्यांनी पक्षाचे काम सुरू ठेवले. अखेर आज गांधी भवन येथे काँग्रेसच्या बैठकीत शहर उपाध्यक्ष पदावर वर्णी लावत नियुक्ती पत्र देण्यात आले. खासदार डॉ.कल्याण काळे, पक्षाचे निरीक्षक डॉ.वजाहत मिर्झा, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख, पूर्व विधानसभेचे निरीक्षक विद्याताई पाटील, पश्चिमचे निरीक्षक सुरेंद्र गोडसकर, मध्यचे निरीक्षक रिझवान सौदागर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान, प्रदेश सचिव एड सय्यद अक्रम, डॉ.जितेंद्र देहाडे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहराध्यक्ष मोईन इनामदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






