शिवसेनेने डॉ.शोएब हाश्मी यांना दिली मोठी जबाबदारी, लोकसभा निवडणुकीत होईल फायदा...!
डॉ.शोएब हाश्मी यांना शिवसेनेने दिले पद, लोकसभा निवडणुकीत होईल फायदा
औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्ह्यात पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. याचा फायदा या निवडणुकीत पक्षाला होईल. डॉ. शोएब हाश्मी यांना महत्वाची जवाबदारी जिल्हा संघटक पद उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. डॉ. हाश्मी यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून ते कामाला लागले आहेत. अल्पसंख्याक समाजाला सुध्दा ते शिवसेनेसोबत जोडत आहे. डॉ. हाश्मी हे मराठवाड्यातील नामांकित डॉक्टर आहेत व एशियन हाॅस्पीटलचे चेअरमन आहे. या सोबतच दत्ता गोर्डे पाटील यांना उपजिल्हाप्रमुख पैठण, उत्तमराव पाटील निकम यांना उपजिल्हाप्रमुख वैजापूर, विठ्ठल बदर यांना उपजिल्हाप्रमुख सिल्लोड विधानसभा, डॉ.शोएब हाश्मी यांना जिल्हा संघटक, सचिव तायडे शहर संघटक, डॉ.राजीव डोंगरे वैजापूर विधानसभा प्रमुख, दिनकर पवार, समन्वयक, वैजापूर तालूका, राजू वैद्य, महानगरप्रमुख शहर या जवाबदारी शिवसेनेने पदाधिकारी यांना दिली आहे.
What's Your Reaction?