इब्राहिम पठाण औरंगाबाद पूर्व मधून निवडणूक लढण्यास इच्छुक...!

 0
इब्राहिम पठाण औरंगाबाद पूर्व मधून निवडणूक लढण्यास इच्छुक...!

औरंगाबाद पूर्व मधून इब्राहिम पठाण इच्छुक, उमेदवारी देण्याची होत आहे मागणी

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.11(डि-24 न्यूज) महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते काँग्रेस इब्राहिम पठाण यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाचे शहर अध्यक्ष शेख युसूफ यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला आहे. कॉंग्रेसचे पदाधिकारी मोहम्मद जाकीर, सईद खान, इरफान पठाण, कैसर बाबा, सलीम शेख व वॅार्ड अध्यक्ष उपस्थित होते. 

इब्राहिम पठाण हे गेल्या 42 वर्षांत एन एस यु आय, युवक काँग्रेस, शहर जिल्हाअध्यक्ष कॉंग्रेस, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ संचालक, तसेच पक्षात अनेक पदे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते इब्राहिम पठाण यांनी भूषविलेले आहे. पक्षात सक्रिय कार्य एकनिष्ठ राहुन करत आहेत.

काँग्रेस पक्षाचे ते अनुभवी व निष्ठावंत कार्यकर्ता असून त्यांना औरंगाबाद पूर्व विधानसभाची उमेदवारी काँग्रेस पक्षातर्फे देण्याची मागणी होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow