एमआयएमने कोणाला दिली ऑफर...!

 0
एमआयएमने कोणाला दिली ऑफर...!

एमआयएमची महाविकास आघाडीला ऑफर नसता उमेदवार पडले तर सांगू नका...!

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार नसल्याचा केला इन्कार...

जरांगे फॅक्टरमुळे पराभव झाल्याची कबुली...जरांगे, राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीत जाण्याचा प्रस्ताव खुला, 30 जागेवर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याची दिली माहिती...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सोबत घेतल्यास त्यांचाच फायदा होईल. कोण कोणत्या पक्षांसोबत जात आहे याची आयडियालाॅजी राहिलेली नाही. एम आय एम राज्यातील 30 जागेवर तयारी करत आहे. महाविकास आघाडीने निमंत्रण दिले तर दोनच मिनिटात किती जागा द्यायची ठरवावे आम्ही सोबत येण्यास तयार आहेत. जागा किती पाहीजेत आम्ही अडून बसणार नाही. लवकर मैत्रीचे निमंत्रण मिळाले नाही तर नाईलाजाने उमेदवार उभे करावे लागणार. तुमचे उमेदवार पडले तर आरोप प्रत्यारोप करायचे नाही अशी ऑफर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे हे प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले मी कधीही दोनशे टक्के एम आय एम सोडणार नाही. तिनदा पक्षाने उमेदवारी दिली. दोनदा यश मिळाले तिस-यांदा पराभव झाला. जरांगे फॅक्टरमुळे पराभव झाला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सोबत घेतल्यास अधिक फायदा होईल. आमची ताकत जेथे आहे तेथे आम्हाला जागा द्यावी. नसता त्यांचे उमेदवार पडले तर दोष देऊ नये. तिस-या आघाडीचा व जरांगे हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा करणार आहे त्यांनी सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांच्यासोबत निवडणूक लढू असेही जलिल म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow