जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री अब्दुल सत्तार इच्छुक...? मुख्यमंत्री घेणार निर्णय
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री अब्दुल सत्तार इच्छुक
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज) जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे खासदार बनले म्हणून या पदासाठी अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार हे इच्छुक आहेत. त्यांनी हि इच्छा आज पत्रकार परिषदेत बोलून दाखविली. त्यांनी सांगितले शिंदेंचे 9 रत्न होते त्यामधून भुमरे आता खासदार झाले मी एकमेव मंत्री शिंदे गटाचा आहे मग या पदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले तर काम करण्यास आवडेल. सरकारचा कार्यकाळ शंभर दिवसांचा उरलेला आहे. संधी मिळाली तर जिल्ह्याच्या विकासासाठी मी पालकमंत्री बनलो तर नशीबवान असे त्यांनी सांगितले. त्यांना विचारले की भाजपाकडून मंत्री अतुल सावे यांच्यासाठी पालकमंत्री पदाची मागणी होत आहे या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की "हमारे अंगने मे उनका क्या काम है" असे अब्दुल सत्तार म्हणाले. यावरून असे दिसून येत आहे की मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आमदार संजय सिरसाट सुध्दा मंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होती किंवा नाही हा येणारा काळच ठरवेल परंतु अब्दुल सत्तार हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत आता हे स्पष्ट झाले.
What's Your Reaction?