पूर्व मधून तिस-यांदा अतुल सावे यांना उमेदवारी, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
पूर्व मधून अतुल सावे यांची उमेदवारी जाहीर
कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षा कडून पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 99 जणांच्या नावाची घोषणा पक्षाकडून करण्यात आली असून यात औरंगाबाद पूर्व मधून राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली.
रविवारी दुपारी भाजप कडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मागील 10 वर्ष पासून पूर्व मतदार संघाचे नेतृत्व करणारे राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. पूर्व मतदार संघातील गारखेडा, सिडको, कैलास नगर भागात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके, ढोल ताशा वाजवत नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी मंत्री तसेच महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
कैलास नगर येथील वयोवृद्ध आजीने श्री अतुल सावे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ढोल ताशांच्या तालावर नृत्य सादर करत मंत्री श्री अतुल सावे यांचे स्वागत करत आशीर्वाद दिला. आजीने केल्या या नृत्यावर उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या.
उबाठा गटाच्या शेकडो निष्ठावान यांचा भाजप मध्ये प्रवेश
पूर्व मतदार संघातील जय भवानी येथील उबाठा गटाचे निष्ठावान पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मंत्री श्री अतुल सावे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शेकडो युवकांनी भाजप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. प्रकाश धुर्वे यांच्यासह बबलू धोत्रे, विशाल कवडे, धीरज चव्हाण, दिलीप काटे,राहुल तुपे, आकाश शिंदे यांच्या सह शेकडो युवकांनी आज प्रवेश केला.
यावेळी अनिल मकरीये, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेठे, बालाजी मुंडे, विवेक राठोड, नितीन खरात, रामेश्वर दासपुते, प्रकाश धुर्वे, शैलेश भिसे, श्रीकांत घुले, यांच्या सह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची
उपस्थिती होती.
What's Your Reaction?