शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला पाहीजे शंभर कोटींचे पॅकेज...!
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला पाहीजे शंभर कोटींचे पॅकेज...
मंत्री अब्दुल सत्तार करणार सरकारकडे पाठपुरावा, पत्रकार परिषदेत दिली माहिती...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)
रामकृष्ण सिंचन योजनेसाठी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत दिलेले ६४२६.५९ लाख मुद्दल कर्ज शासनाने माफ केले. परंतु त्यावरील व्याजाचा निर्णय बॅंकेने घ्यावा असे सूचित केले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शासनाने बॅंकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष पॅकेज द्यावे अथवा दीडशे कोटी रुपये दहा वर्षांसाठी बिनव्याजी द्यावे, हि रक्कम दिल्यास 2078 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे असा निर्णय झाल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वैजापूर तालुक्यातील श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने बंद पडली होती. याबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या सिंचन योजनेसाठी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 2 हजार 78 शेतकऱ्यांवर दिर्घ मुदतीचे कर्ज मुद्दल रक्कमसह 64 कोटी 26 लाख 59 हजार थकीत होते. त्यावर 145 कोटी 27 लाख 90 हजार व्याजासह तब्बल दोनशे कोटी 9 लाख 54 हजार थकीत होते. याचा बोजा शेतकऱ्यांच्या जमिनीवर नोंदवण्यात आलेले होता. त्यामुळे कर्जमाफी देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यास यश येऊन 18 जून रोजी शासनाने या योजनेचे थकीत कर्ज 64 कोटी 26 लाख 59 हजार माफ केले व व्याजाचा निर्णय बॅंकेने घेऊन सादर करावे, असे सूचित केले होते. त्यानूसार आज शनिवारी बॅंकेचे अध्यक्ष अर्जुनराव गाढे, उपाध्यक्ष किरण अशोकराव पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाची बैठक झाली. यात कर्जमाफीचे सर्वांनी स्वागत केले. मात्र कर्जावर व्याज सोडल्यास बॅंकेसमोर आर्थिक अडचणी येतील. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल. त्यामुळे शासनाने कर्ज माफीवरील व्याजापोटी बॅंकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष पॅकेज द्यावे, किंवा दीडशे कोटी बिनव्याजी कर्ज दहा वर्षांसाठी द्यावे, असा ठराव एकमताने झाल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मंत्री म्हणून पाठपुरावा करणार आहे असे त्यांनी सांगितले. नांदेड बॅंकेच्या धर्तीवर जिल्हा बॅंकेला विशेष पॅकेज द्यावे, असा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवणार आहे. त्यासाठी मंत्री म्हणून मी स्वत: तसेच जिल्हातील आमदार, खासदार देखील पाठपुरावा करतील, असे अब्दुल सत्तार यांंनी सांगितले. शासनाने विनंती मान्य केल्यास बॅंक आर्थिक संकटातून बाहेर पडले. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वैजापूर तालुक्यातील महालगाव, भगुर, पानवी, टेंभी, शिरसगाव, बल्लाळीसागज, एकोडी, खिर्डी, माळीसागज, कनक सागज, टाकळी, सागज, गोळवाडी, पालखेड, दहेगाव साठी श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी जलसिंचन उपसा योजना वैजापूर तालुक्यासाठी 1988 ते 1998 या कालावधीत नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे अर्थ सहाय्याने कार्यान्वित केली होती. एकूण सभासद 2117, कर्जदार सभासद 2078, एकूण लाभक्षेत्र 16000 एकर, पाणी परवाण्यात्यानुसार भिजणारे क्षेत्र 11000 एकर आहे. तारण क्षेत्र 8934 एकर या सातबारा उता-यावर कर्ज बोजा नोंद आहे.
मनोज जरांगेचे अभिनंदन केले दुसऱ्याच्या पोटात दुखण्याचे कारण काय...
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले त्यामुळे मी श्री जरागे यांचे अभिनंदन केले त्यांचे अभिनंदन केले हे पाप असेल तर मी ते रोज करण्यास तयार आहे. जरांगे यांचे अभिनंदन केले म्हणून दुसऱ्याच्या पोटात दुखण्याचे कारण काय असावा नाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीतच मुख्यमंत्री दहा दिवसात आरक्षण देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगले निर्णय घेत आहेत. अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद केली. अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केले. वक्फ बोर्डाच्या जमीनी सुरक्षित ठेवण्यासाठी निर्णय घेतला. लवकरच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टीचा जी आर काढणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार पुन्हा येईल. असा विश्वास व्यक्त करत त्यांनी स्पष्ट केले की सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. या पत्रकार परिषदेला बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव गाढे , उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, डॉ. सतीश गायकवाड व इतर संचालक उपस्थित होते
What's Your Reaction?