7 जुलै रोजी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा, अंबादास दानवे यांची माहिती
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजीनगरात कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा...
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषदेत माहिती...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज ) शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार या घोषवाक्याखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवार ता. ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरातील बीड बायपास रोड वरील सूर्या लॉन्स येथे शिवसंकल्प मेळावा संपन्न होणार आहे. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज ता. ३० जुन रोजी मातृभूमी प्रतिष्ठाण संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सदरील मेळाव्या दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना तांत्रिक, सामाजिक व राजकीय मार्गदर्शन केले जाणार आहे. पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार, प्रसार व कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात यावे यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा हा या मागचा उद्देश असल्याचे दानवे यांनी म्हटले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची जानेवारी महिन्यापासून प्रचार करण्यास सुरूवात केली होती. एकूण 105 सभा या दरम्यान त्यांनी घेतल्या होत्या त्याचे परिणाम आपल्या सर्वांसमोर असून त्याच धरतीवर विधानसभेच्या निवडणुकीची पूर्व तयारीची सुरुवात संभाजीनगर येथून सुरुवात करण्यात येणार असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले.
जिल्ह्यातील एकूण पाच हजार शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होणार आहे. मागील दोन ते अडीच वर्षात घडलेल्या घटनांना विसरून पुन्हा एकदा नव्याने जोमाने पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेने एकूण ६ विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. परंतु दोन वर्षांपूर्वी यातील पाच जणांनी गद्दारी करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास घात केलेला आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा सहा जागा जिंकून आणण्यासाठी या मेळावा दरम्यान संकल्प केला जाणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी दिली.
सदरील मेळाव्याच्या नियोजनासाठी संभाजीनगर शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी यांच्यासमवेत दानवे यांनी आपल्या कार्यालयात आज बैठक घेतली. शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन मतदार नोंदणी, जुन्या मतदारांची दुरुस्ती व मतदान ओळखपत्र काढून देण्यासाठी वॉर्डनिहाय शिबिर आयोजित करण्यात यावे अशी सूचना यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना अंबादास दानवे यांनी केली.
या बैठकीचे सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांनी आभार मानले व समारोप केला. याप्रसंगी सह संपर्कप्रमुख विजयराव साळवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य व महिला आघाडी संपर्कसंघटिका सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक डॉ. शोएब हाश्मी, किसानसेना जिल्हाप्रमुख नाना पळसकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, कृष्णा पाटील डोणगावकर, अविनाश गलांडे, लक्ष्मण भाऊ सांगळे, जयवंत ओक, बाबासाहेब डांगे, बप्पा दळवी, अशोक शिंदे, संतोष जेजुरकर,अनिल पोलकर, अविनाश पाटील, विठ्ठल बदर, हिरा सलामपुरे, शिवा लुंगारे, सुदर्शन अग्रवाल, अवचित नाना वळवळे, चंद्रकांत गवई, विजय वाघमारे, तालुकाप्रमुख संजय मोटे, दिनेश मुथा, रघुनाथ घारमोडे, दिलीप मचे, सोमीनाथ करपे, शंकरराव ठोंबरे, सुभाष कानडे, सचिन वाणी, आनंद भालेकर, तालुका समन्वयक सचिन गरड, शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, मनाजी पाटील मिसाळ, तालुका संघटक अमित वाहुळ, गुलाबराव कोलते, शहरप्रमुख डॉ.सदाशिव पाटील, प्रकाश चव्हाण, अल्पसंख्याक विभाग जिल्हा संघटक रऊफ शेख, महिला आघाडी उपजिल्हा संघटक मीनाताई फसाटे, दुर्गा भाटी, सुनंदा खरात, जयश्री लुंगारे, अनिता मंत्री, नलिनी बाहेती, शिव अंगणवाडी जिल्हा संघटक राखी सुरडकर, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, आशा दातार, भागुबाई शिरसाठ, विधानसभा संघटक नलिनी महाजन, मीरा देशपांडे, उपशहर संघटक रेखा शहा, जिल्हा युवाधिकारी उमेश मोकासे, शुभम पिवळ व मच्छिंद्र देवकर, मनोज ओपकर, पवन भिसे, महेंद्र जहागीरदार, दादासाहेब पगार, योगेश मोहिते, मयूर चाबुकस्वार, नंदकुमार साळुंखे, किशोर स्वांद्रे, अनिस पटेल व संजीव कोरडे उपस्थित होते.
What's Your Reaction?