मुस्लिम मुक्त होणार महाराष्ट्रातील विधानपरिषद, काँग्रेसला भरभरून मते दिली तरीही...!
मुस्लिम आमदार मुक्त होणार महाराष्ट्रातील विधानपरिषद, काँग्रेसला भरभरून मते दिली तरीही...!
लोकसभा निवडणुकीतही राज्यात एकही उमेदवार मुस्लिम महाविकास आघाडीच्या वतीने दिला नाही.... मराठवाड्यात महाविकास आघाडीचे सात खासदार निवडून आले तरीही अल्पसंख्याक समाजाला नाही मिळाला न्याय...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) 78 सदस्य असलेले विधानपरिषदेचे सर्वोच्च सभागृह आता मुस्लिम आमदार मुक्त होणार आहे. 27 जुलै रोजी काँग्रेसचे आमदार डॉ.वजाहत मिर्झा व राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी निवृत्त होत आहे. काँग्रेसने पुन्हा प्रज्ञा सातव यांना संधी दिली. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने भरभरून मते दिली. काँग्रेसचे 13 खासदार, उध्दव ठाकरे गटाचे 9, शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले. विधानपरिषदेत कायदे बनवली जातात आता या सभागृहात मुस्लिम आमदार नसल्याने समाजाचे प्रश्न कोण मांडणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसचा एक सदस्य निवडून येण्याची शक्यता असल्याने हायकमांडने प्रज्ञा सातव यांच्या नावाला सहमती दर्शवून उमेदवारी दिली. मुस्लिम समाजाची मते चालतात परंतु प्रतिनिधित्व देण्याची वेळ आली तर डावलले जाते अशी टिका महाविकास आघाडी विरोधात वंचितचे प्रवक्ते फारुख अहेमद यांनी केली आहे. सर्व सेक्युलर पक्ष दलित मुस्लिम समाजाचे मतांवर राजकारण करतात द्यायची वेळ आली तर हात आखडता घेतात यासाठी मुस्लिम समाजाने एकजूट दाखवून अशा पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, राष्ट्रीय महासचिव के.सी.वेनुगोपाल, राज्यसभेचे सदस्य तथा अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातील मुस्लिम नेते, पदाधिकारी यांनी फोन करून नाराजी व्यक्त केली आहे. चेनिथला यांना एका पदाधिकाऱ्यांने फोन करून विचारले तर त्यांना उत्तर देने उमजले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
शरद पवार गटातून शेकपाचे जयंत पाटील, उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर, शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाणे, भावना गवळी, राष्ट्रवादी(अजित पवार गट) शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, भाजपाकडून पंकजा मुंडे, परिणय फुंके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे. 11 विधानपरिषदेच्या जागेसाठी 12 जूलै रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.
What's Your Reaction?