प्रिपेड विजेच्या मिटर विरोधात समाजवादी रस्त्यावर...!

 0
प्रिपेड विजेच्या मिटर विरोधात समाजवादी रस्त्यावर...!

प्रिपेड विजेच्या मिटर विरोधात समाजवादी रस्त्यावर...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि. 2(डि-24 न्यूज) विजेच्या प्रिपेड मिटरच्या विरोधात आज भडकलगेट येथे समाजवादी पार्टीच्या वतीने आक्रोश मोर्चा मिल काॅर्नर येथील महावितरणच्या कार्यालयावर महानगर अध्यक्ष फैसल खान यांच्या नेतृत्वाखाली काढला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, प्रधान सचिव उर्जा, व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे स्मार्ट प्रिपेडला संपूर्ण नकार आहे तर पोस्टपेड मिटर आहे त्या स्थितीत ठेवणे. महावितरण ने हे मिटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली. टेंडरही काढण्यात आले घरगुती व उद्योग करणाऱ्यांना हे मिटर लावू नये. विज कायदा 2003 मध्ये अधिनियम क्रं.47 अन्वये कोणते मिटर वापरायचे याचे स्वतंत्र मिटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर अधिकार हक्क संबंधित विज ग्राहकांना आहेत. कंपनी अघोषित सक्ती करुन ग्राहकांच्या या हक्कांचे उल्लंघन करु नये. दिल्ली, हरयाणा या ठिकाणी 200 युनिट विज ग्राहकांना मोफत आहे. महाराष्ट्रात सुध्दा विद्युत ग्राहकांना 200 युनिट विज मोफत द्यावे. दिल्लीत 2.50 पै. , हरयाणा 2.75 पै., गुजरात राज्यात प्रती युनिट 3 रुपये दर आहेत परंतु महाराष्ट्रात घरगुती वापरासाठी प्रती युनिट दर 7.35 पै. दर आहेत. महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होत आहे. शहरातील रशिदपूरा, कटकट गेट, शरीफ काॅलनी, रहेमानिया काॅलनी, रोशनगेट, चंपा चौक, आसेफीया काॅलनी येथे नेहमी विजेचा लपंडाव सुरू असतो आम्हाला असे वाटते अघोषित लोडशेडींग सुरू झाली की काय म्हणून या भागात नियमित विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी अयूब खान, मुन्नाभाई, रियाजोद्दीन देशमुख, रियाज अन्सारी, प्रिती दुबे, बाबा बिल्डर, सलमान सरकार, शेख मोहसीन, मोईन फारुकी, शेख अलीम, डॉ.शरीफ, डॉ.महेबुब, मलेका बाजी, संगीता कापडे, फरहाज सिद्दीकी, मिर्झा जलिल बेग, रमेश रेवनकर, सिमा मांडवीया, इब्राहिम शेख, अक्रम खान, मिर्झा फारुक बेग, मुसा खान, एड रसीन सिद्दीकी, मिर्झा शफीक बेग, सय्यद अजहर, इरफान पटेल, आदील कुरेशी, नदीम पाशा, नईम खान, वसीम खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow