जावेद महेमूद यांची आझाद समाज पार्टीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती...

जावेद मेहमूद यांची आजाद समाज पार्टी शहराध्यक्षपदी नियुक्ती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज) –
आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे संस्थापक विचारवंत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेबरोबरच दिवंगत कांशीराम यांचे मिशन पुढे नेण्यासाठी युवकांना नेतृत्व मिळावे या उद्देशाने पक्षात नव्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राहुल पंडीतराव साबळे यांनी जावेद मेहमूद शेख (छत्रपती संभाजीनगर) यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. खासदार अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्या कणखर नेतृत्वाखाली जावेद मेहमूद हे संघटन बळकट करण्यासाठी कार्य करतील, असा विश्वास जिल्हा अध्यक्षांनी व्यक्त केला.
नियुक्ती स्विकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना जावेद मेहमूद म्हणाले की –
“येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आजाद समाज पार्टी ताकदीने आपले उमेदवार उभे करणार आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, वंचित आणि शोषित समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. संघटनेच्या माध्यमातून शहरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या नियुक्तीची माहिती खालील मान्यवरांना कळविण्यात आली आहे –
तसेच महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष सत्यजीत साह, हारुन अंसारी, अल्ताफ खान, इमरान बिल्डर, सोहेल साहब, आदिल साहब, तालिब साहब, मोईन साहब यांनी जावेद मेहमूद यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे जावेद मेहमूद यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षम होईल आणि जनतेशी घट्ट नाळ जोडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






