दलित, ओबीसी, मायनाॅरीटीज व आदीवासी संघटनेचे अधिवेशन...

दलित, ओबीसी, मायनाॅरीटीज व आदीवासी संघटनेचे अधिवेशन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) -
दलित, ओबीसी, मायनाॅरीटी, आदीवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार उदीतराज यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. अशी माहिती दलित, ओबीसी, मायनाॅरिटीज, आदीवासी(डोमा) चे जिल्हाध्यक्ष प्रा.बादशहा पटेल यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले चारही समाजाला एकत्रित करुन अन्यायाविरुध्द लढा उभा करुन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील वंचित घटकांना संघटनेसोबत जोडण्यात येईल. मोठ्या संख्येने राज्य अधिवेशनात उपस्थित राहावे असे आवाहन बादशहा पटेल यांनी केले आहे. अधिवेशनाला डाॅ.उदीत राज(IRS), महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रीतम आठवले उपस्थित होते.
What's Your Reaction?






