अखेर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टीची झाली घोषणा, एड अजहर पठाण यांच्या प्रयत्नांना यश
अल्पसंख्याक हक्क दिवशी केली मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली मार्टीची घोषणा
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) समाजातील विविध घटकांच्या विद्यार्थी आणि तरुणांना उच्च शिक्षण, फेलोशिप, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि प्रगत आयटी शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी सारथी, बार्टी, महज्योती, टारती,अमृत स्वतंत्र शासनाची सवायत्त संस्था स्थापन केल्या आहेत. त्याच धर्तीवर अल्पसंख्याक मुस्लिम तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MARTi) स्थापन करण्याच्या गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी 18 डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त वसंतराव देशपांडे सभागृह, नागपुर येथे मार्टि कृती समितीच्या वतीने निवेदन उपोषण , महाराष्ट्रातील जनता आणि नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर अनेक मंत्री, विधानसभा/विधानपरिषद सदस्य आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून घोषणा केली. आज नागपुरात विशेष कार्यक्रमात, मार्टि कृती समिती महाराष्ट्राचे पदाधिकारी अड अझहर पठाण, अध्यक्ष, सर आसिफ उपाध्यक्ष, आणि वसीम कुरेशी विधी सल्लागार यांनी मंत्री अब्दुल सत्तार अल्पसंख्याक यांना नागपुरच्या कार्यक्रमात आभार पत्र सुपूर्द केले... पुढील दोन महिन्याभरात (मौलाना आझाद संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) नियम बनवून मार्टीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. असे आश्वासन ही मंत्री महोदयानी यावेळी दिले. हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार अबु असिम आझमी, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, आमदार भाई जगताप, आमदार राजू नवघरे, आमदार सतेज पाटील यांनी या प्रश्नावर विधानभवनात चर्चा घडवून आणली त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला.
What's Your Reaction?