इरफान शेखने गाजवली संत साहित्यावरील रिंगण वक्तृत्व स्पर्धा

 0
इरफान शेखने गाजवली संत साहित्यावरील रिंगण वक्तृत्व स्पर्धा

इरफान शेखने गाजवली 

संतसाहित्यावरील रिंगण वक्तृत्व स्पर्धा

- आळंदी येथे पार पडलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

- संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण 

- `वक्तृत्व स्पर्धेतल्या मुलांनी टीवी पत्रकारितेत संधी` - ऱाजीव खांडेकर 

आळंदी, दि.19(डि-24 न्यूज) रिंगण वक्तृत्व स्पर्धा या संतविचारांवर आधारित महाराष्ट्रातल्या पहिली आणि एकमेव वक्तृत्व स्पर्धा यंदा औरंगाबादच्या इरफान शेखने गाजवली. त्याने संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही या विषयावर मत मांडून दुसरा क्रमांक मिळवला. तर नाशिकची श्रुती बोरस्ते हिने 11 हजार रुपये रोख रकमेचं पहिलं पारितोषिक पटकावलं, रविवारी आळंदी येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून आलेल्या 69 स्पर्धकांनी भाग घेतला. 

राज्यभरातल्या अनेक जुन्या आणि नामवंत वक्तृत्व स्पर्धा बंद होत असताना रिंगण वक्तृत्व स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अत्यंत सुखद आहे, असे ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी बक्षिस वितरण समारंभात सांगितलं. राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचं हे तिसरं वर्षं असून दर आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या वार्षिक रिंगणने श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदतीने याचे आयोजन केले होते. मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे कार्यक्रमाला उपस्थित होते. 

वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांना टीव्ही पत्रकारितेत मोठी संधी असल्याचेही खांडेकर यांनी सांगितले. तर उत्तम वक्तृत्वाचा उपयोग संतविचारांच्या प्रसारासाठी करा, तुमच्या उपजिविकेची काळजी समाज घेईल, असं आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांनी उद्घाटन प्रसंगी केले. नाशिक येथील साहित्यिक नंदन रहाणे आणि औरंगाबादहून आलेले पत्रकार – व्याख्याते नीलेश चव्हाण यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा, 

पहिला क्रमांक - रुपये 11 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 

श्रुती बोरस्ते (नाशिक) 

विषय- भक्ती तीच जी धर्माची कुंपण उध्वस्त करते,  

दुसरा क्रमांक – रुपये 9 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 

इरफान शेख (औरंगाबाद)

विषय- संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही 

तिसरा क्रमांक – रुपये 7 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 

यश पाटील (मुंबई)

विषय - अवघा रंग एक व्हावा

चौथा क्रमांक – रुपये 5 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 

पराग बदिरके (महाड - रायगड)

विषय - बंडखोर शिष्य: संत परिसा भागवत

पाचवा क्रमांक – रुपये 3 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 

तेजस पाटील (कोल्हापूर)

विषय - 'जातीभेदाच्या आजारावर संतविचारांचं प्रिस्क्रिप्शन

उत्तेजनार्थ पारितोषिकं - रुपये 2 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 

अभय आळशी, आदित्य देशमुख, अमोल गोळे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow