कदीर मौलाना यांचे महाविकास आघाडीला समर्थन...!
कदीर मौलाना यांचे महाविकास आघाडीला समर्थन...!
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) बिआरएसचे नेते अब्दुल कदीर मौलाना यांनी महाविकास आघाडीचे उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हि घोषणा केली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे, जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ.कल्याण काळे, अहमदनगर येथून निलेश लंके व राज्यात ज्या मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी पुढे सांगितले राज्यात बिआरएसने निवडणुकीत उमेदवार उभे केले नाही. मोदींना रोखण्यासाठी हा निर्णय मी स्वतः घेतला आहे. माझे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करणार आहे. जातीपातीचे राजकारण न करता राष्ट्रीय स्तरावर जो निर्णय मुस्लिम धर्मगुरु यांनी घेतला आहे त्यानुसार समाजाने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
What's Your Reaction?