सईदा काॅलनीच्या ड्रेनिजलाईनचे काम प्रगतीपथावर, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

 0
सईदा काॅलनीच्या ड्रेनिजलाईनचे काम प्रगतीपथावर, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

सईदा काॅलनीच्या ड्रेनिजलाईनचे काम प्रगतीपथावर, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण, निवडणुका जसजशा जवळ येत आहे लोकप्रतिनिधी विकासकामांकडे लक्ष देत आहे...

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) वार्ड क्रमांक 4, राजनगर-चेतनानगर वार्डातील सईदा काॅलनी परिसरातील वस्तीसाठी नविन ड्रेनिजलाईनचे काम प्रगतीपथावर असल्याने अनेक वर्षांपासून त्रास भोगावा लागला असल्याने आता काम जलदगतीने सुरू असल्याने येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी या कामासाठी निधी दिल्याने येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचे डबके तुंबणार नाही. 

खासदार इम्तियाज जलील यांच्या स्वेच्छा निधीतून या वार्डात सात ते आठ सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते बनले असल्याने येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध झाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाम नदीपासून ड्रेनिजलाईनचे काम सुरू झाले आहे. हरिओमनगर पासून नवाब मस्जिद, सुमैरा गार्डन ते आनंद क्लिनिक पर्यंत मुख्य ड्रेनिजलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. 1400m ची हि लाईन आहे त्यापैकी 800m काम पूर्ण झाले आहे. 15 दिवसांत मुख्य लाईनचे काम पूर्ण होईल. औरंगाबाद मध्यसाठी 250 कोटींपर्यंत निधी ड्रेनिजलाईनसाठी मंजूर झाले आहे म्हणून सईदा काॅलनी व परिसरातील इंटरनल ड्रेनिजलाईनचे काम हे काम पूर्ण झाल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले येथील नागरिकांची ही मोठी समस्या होती. सुरू असलेल्या ड्रेनिजलाईनसाठी निधी कमी पडू देणार नाही. नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे सुध्दा काम युध्दपातळीवर सुरू आहे. पावसाचे पाणी घरात घूसणार नाही याची दक्षता घेत काम सुरू आहे. यानंतर मुख्य रस्त्यांचे कामे पूर्ण केली जातील असेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow