पत्रकार तौफिक शहेबाज यांना मिळणार एमआयएमचे तिकीट...?
पत्रकार तौफिक शहेबाज यांना मिळणार एमआयएमचे तिकीट...?
इम्तियाज जलिल यांची मिळाली हिरवी झेंडी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएमची प्रभाग 5 मधून पत्रकार तौफिक शहेबाज यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
शहरातील महापालिका निवडणुक यंदा प्रभाग पध्दतीने होणार आहे. अटीतटीची निवडणूक होणार आहे. एका प्रभागातून एका पॅनलमध्ये चार उमेदवार प्रत्येक पक्षाचे असणार आहे. तौफिक शहेबाज हे भडकलगेट व परिसरात आपल्या समाज कार्याने परिचित असल्याने गेल्या निवडणुकीत त्यांची संधी हुकल्यामुळे यंदा ते या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. इम्तियाज जलिल हे स्वतः पत्रकारिता क्षेत्रातून येवून एकदा आमदार व खासदार म्हणून निवडून येऊन इतिहास रचला. सध्या ते एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना प्रश्न विचारला की आपल्या पक्षाकडून काही पत्रकार हि निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत याला उत्तर देताना त्यांनी सांगितले सक्षम व मजबूत उमेदवार लोकांमध्ये लोकप्रिय व नवीन चेह-यांना संधी दिली जाईल यामध्ये काही पत्रकार हि असू शकतात. या वक्तव्यामुळे तौफिक शहेबाज यांचा आत्मविश्वास वाढल्याने ते आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत व विजयी पताका फडकावणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?