अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन, महाराष्ट्र शोकसागरात बुडाला...
अजित दादा यांच्या निधनाची बातमीवर विश्वास बसत नाही, बारामती विमान अपघातात निधन...
बारामती, दि.28(डि-24 न्यूज) - आज सकाळी महाराष्ट्रासाठी दु:खद बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान बारामती विमानतळावरुन लैंडींक दरम्यान कोसळल्याने त्यांचा अपघाती निधन झाले आहे. अजित दादा यांच्या सह या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. त्यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी प्रचारासाठी जाण्यासाठी ते विमानाने निघणार तर विमान लैंडींग करताना कोसळले व त्यामध्ये आग लागली या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पसरली यामुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. ते महाराष्ट्रातील मुरब्बी व अनुभवी नेते होते. त्यांच्या मृत्यूची बातमीवर विश्वास बसत नाही तर हि बातमी मनाला चटका लावणारी अशी भावना जनतेमध्ये आहे. अपघाताची माहिती मिळताच पत्नी सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे व कुटुंबातील सदस्य बारामती कडे रवाना झाले.
अजित दादा यांच्या सोबत त्यांचे पीए व इतर सहकारी होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
घटना अहवाल...
तारीख, 28/1/2026
संचालक, व्हिएसआर
विमानाचा प्रकार, लियरजेट 45
विमानाची नोंदणी, व्हिटी-एस एस के
स्थळ बारामती विमानतळ
विमानातील व्यक्तींची संख्या, चालक दलासह 5
तपशील...
विमानाचे बारामती येथे अपघातात लैंडींग झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन इतर व्यक्ती एक पीए व एक सेवक आणि दोन चालक दल ज्यामध्ये पायलट इन कमांडो व फर्स्ट ऑफिसर विमानात होते.
प्राथमिक माहितीनुसार विमानात असलेल्या पैकी कोणीही या अपघातात बचावलेले नाही.
अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. सध्या ते महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. 13 वर्षात पाचव्यांदा ते उपमुख्यमंत्री पदी विराजमान होते. राजकीय व प्रशासन चालवण्याचा त्यांचा दांडगा अनुभव होता. सर्वांना सोबत घेऊन ते पुढे जात असताना अचानक दादांची एक्झिट झाल्याने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
अजितदादा पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राला धक्का बसला आहे. त्यांच्या सोबत मुंबई पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही या घटनेत होरपळून मृत्यू झाला आहे.
अजितदादा पवार यांची राजकीय कारकीर्द...
अजित दादा पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार हि दोन मुले,
अजितदादा हे सहकारी साखर कारखाना संचालक मंडळावर 1982 मध्ये निवडून आल्यानंतर राजकीय कारकीर्द सुरू झाली होती.
1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून खासदार बनले. नंतर त्यांनी काका शरद पवार यांच्यासाठी हि जागा सोडून महाराष्ट्रातील राजकारणात उडी घेतली. बारामती विधानसभा मतदारसंघातून ते 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पहिल्यांदा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत 1991 मध्ये निवडून गेले. 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
नोव्हेंबर 2023 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचे नाव व घड्याळ चिन्ह दिले.
What's Your Reaction?