उद्या "महाराष्ट्र बंद"ची वंचित बहुजन आघाडीची हाक, विविध पक्ष संघटना यांनी सहभागी होण्याचे आवाहन...

 0
उद्या "महाराष्ट्र बंद"ची वंचित बहुजन आघाडीची हाक, विविध पक्ष संघटना यांनी सहभागी होण्याचे आवाहन...

दिल्लीतील लाठीचार्जविरोधात उद्या वंचितकडून "महाराष्ट्र बंद'ची हाक, विविध पक्ष संघटना यांनी सहभागी होण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) -दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या बंदमध्ये राज्यातील विविध पक्ष संघटना, नागरिक, व्यापारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

पुढे म्हणाले, नीट परीक्षेतील घोळ आणि शैक्षणिक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सनदशीर मार्गाने दाद मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या सांगण्यावरून क्रूर हल्ला करण्यात आला. हा हल्ला केवळ विद्यार्थ्यांवर नसून देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे.

जंतरमंतरवर जमा झालेल्या तरुणांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत, हा लढा आता कोणत्याही एका संघटनेचा नसून देशातील तरुण व त्यांच्या भवितव्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर देशात उभ्या राहिलेल्या 'एज्युकेशन माफिया' आणि पेपर फुटीच्या विरोधात सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठान, वाहतूकदार (रिक्षा, टॅक्सी, बस चालक) यांनी एक दिवस काम बंद ठेवून या दडपशाहीविरोधात आपला विरोध नोंदवावा, या बंदला डाव्या पक्षाने पाठिंबा दिला असून इतर पक्ष आणि संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले. 

या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष रुुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, मिलिंद बोर्डे, संदीप जाधव, सतीश गायकवाड, मतीन पटेल, भगवान खिल्लारे, आनंद शेजुळ, सुरेश मुळे पाटील उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow